Fish Bone Stuck in Throat esakal
कोकण

कुठेही चिरफाड न करता रुग्णाच्या घशात अडकलेला माशाचा काटा काढण्यात डॉक्टरांना यश; अन्न गिळताना होत होता त्रास

रुग्णाच्या घशात २ महिन्यांपूर्वी माशाचा काटा अडकला होता.

सकाळ डिजिटल टीम

अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पडून ४ सेंटिमीटर घशात रूतलेला माशाच्या काट्याचा तुकडा बाहेर काढण्यात यश आले.

सावर्डे : वालावलकर हॉस्पिटल सावर्डे येथे कान, नाक व घसा विभागातर्फे घशाजवळ (स्वरयंत्रा) अडकलेले माशाचा काटाकाढण्याची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. रुग्णाच्या घशात २ महिन्यांपूर्वी माशाचा काटा अडकला होता. त्यानंतर त्याला गिळताना त्रास होत होता. त्यामुळे घशाला सूज येऊन अन्न गिळता येत नव्हते.

चिपळूणचे डॉ. ओंकार शर्मा (ऑर्थोपेडिक सर्जन) यांनी रुग्णाला वालावलकर हॉस्पिटलमध्ये एमआरआय व सिटीस्कॅन करण्यासाठी पाठवले. घशात (Throat) माशाचा काटा स्वरयंत्रानजीक अडकलेला आढळला. डॉ. आनंद जोशी (गॅस्टएन्ट्रोलॉजिस्ट सर्जन), सर्जरी विभागाचे डॉ. मानसिंग घाटगे (डीन), डॉ अविनाश सुरुषे (सर्जन), डॉ. संग्राम दाभोळकर (सर्जन), ईएनटी विभागाचे डॉ. प्रतीक शहाणे (ईएनटी सर्जन) यांनी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

स्वरयंत्रानजीक घशामध्ये अडकलेला माशाचा काटा काढण्याची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पडून ४ सेंटिमीटर घशात रूतलेला माशाच्या काट्याचा तुकडा बाहेर काढण्यात यश आले. शात्रक्रियेनंतर त्वरित रुग्णाला जेवता आले आणि दोन महिने त्रास होत असलेली अन्ननलिका उघडली गेली म्हणून रुग्णाने व त्यांच्या नातेवाईकाने रुग्णालयाचे व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार मानले.

ही शस्त्रक्रिया कान, नाक व घसा विभागाचे तज्ज्ञ डॉ. प्रतीक शहाणे (ईएनटी सर्जन), डॉ. राजीव केणी (ईएनटी सर्जन) व डॉ. सीजा (ईएनटी सर्जन) यांनी पार पडली. या अवघड अशा शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे काम भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर, डॉ. संदीप राव, डॉ. प्राची रबडे व डॉ. केयूर पटेल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT