dream of become a graduate from agriculture he doing farming 
कोकण

शेती करत करत तो होतोय कृषी पदवीधर....

सकाळवृत्तसेवा

संगमेश्वर - आवडीचे शिक्षण आणि त्यातही उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर अंगी केवळ जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असून भागत नाही. शिक्षण घ्यायचे तर आर्थिक परिस्थितीदेखील दमदार असावी लागते. संगमेश्वर नजीकच्या लोवले येथील शुभम संतोष दोरकडे या विद्यार्थ्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आड आली; मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने शेतजमिनीत कलिंगडासह विविध उत्पादने घेत कृषी क्षेत्रात पदवीधर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आई-वडील आणि बहिणीच्या सहकार्याने त्याने कलिंगडाची लागवड केली असून उत्तम पीकही आले आहे.

शिक्षणाचा खर्च करणे त्याच्यासमोर आव्हानच

लोवले येथील शुभम संतोष दोरकडे याने बारावी विज्ञान शाखा पूर्ण झाल्यानंतर कृषी पदवीधर होण्याचा चंग बांधला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला बारावीनंतर लगेचच कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवणे शक्‍य झाले नाही. मात्र, निराश न होता त्याने कृषी मालाची विक्री करणाऱ्या एका दुकानात नोकरी पत्करली. वर्षभर येथे नोकरी करून मिळालेला पगार बचत करून त्याने पुढील वर्षी जिद्दीने सावर्डे (ता. चिपळूण) येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. राहण्याचा, शिक्षणाचा खर्च करणे त्याच्यासमोर आव्हानच होते. बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज मिळवून त्याने यातून मार्ग काढला. मात्र, त्याचवेळी शेतजमिनीत विविध उत्पादने घेण्याचे निश्‍चित केले.
घरातील मंडळींच्या पाठबळामुळे शुभम महाविद्यालयात गेल्यानंतर मालाच्या विक्रीसाठी आई-वडील आणि बहिणीची मोठी मदत होते. संगमेश्वर-देवरुख रोडवर शुभमने शेतमालाच्या विक्रीचा स्टॉल उभा केला. शेती उत्पादनांच्या विक्रीतून त्याच्या हाती चांगले पैसे येत आहेत. 

सेंद्रिय खताच्या जोरावर कलिंगड लागवड

घरी मदतीचे हात असल्याने वडील संतोष, आई सविता आणि बहीण प्रणिता यांनी शुभमचे कृषी पदवीधर होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्याच्या मेहनती हातांना बळ दिले. शुभमने शिक्षण सांभाळत प्रथम गांडूळ खत तयार केले. घरासमोर असणाऱ्या जागेत या वर्षी सेंिद्रय खताच्या जोरावर त्याने कलिंगड लागवड केली. विविध प्रकारच्या पालेभाज्या, भेंडी, वालई शेंग, हळद आणि यामध्ये आंतरपीक म्हणून गोंड्याची लागवड केली. शुभमच्या मेहनतीला चांगले फळ आले.

माझे कृषी पदवीधर होण्याचे स्वप्न आहे. आई-वडील आणि बहीण यांनी माझ्या या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी मोलाची मदत केल्याने तृतीय वर्षापर्यंत पोहचलो आहे. परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे, याचा अनुभव मला यातून मिळाला. परिस्थिती नाही म्हणून रडत न राहता कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपल्याला काहीही अशक्‍य नाही याची अनुभूती यातून मिळाली.
-शुभम दोरकडे, लोवले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT