accident Vaibhavwadi konkan sakal
कोकण

वैभववाडी : चालकाला डुलकी अन् अपघात!

एडगावातील घटना; मिनीबस झाडावर आदळून दोघे जखमी, अपघातांची मालिकाच

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : तळेरे (ता. वैभववाडी) कोल्हापूर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एडगाव येथील रामेश्वर सर्व्हिसिंग सेंटरनजीक आज पहाटे ५.३० वाजता मिनीबसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने ही घटना घडली. यात दोघे प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मिनीबस (एमएच ४७ वाय २५२२) झाडावर धडकली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. शीतल चप्पा (वय ३७) व प्रकाश मंथानिया (वय ३३) हे दोन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मुंबईतील एका कंपनीत काम करणारे हे सर्व कर्मचारी आहेत. सहलीनिमित्त हे सर्वजण मिनीबसने गोव्याला निघाले होते. याच दरम्यान एडगाव येथे चालकाला झोप आल्यामुळे गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर एडगाव येथील तरुण मदत कार्यासाठी धावले. येथील हेमंत रावराणे, सचिन रावराणे, रवि रावराणे, नीलेश रावराणे, रोहन सुतार, बच्चाराम रावराणे या तरुणांनी पोलिस येण्यापूर्वीच जखमींना रुग्णालयात दाखल केले. या बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता. या सर्व प्रवाशांच्या नाश्त्याची सोय एडगावचे माजी सरपंच राजेंद्र सुतार यांनी केली. अपघाताची माहिती मिळताच कॉन्स्टेबल रमेश नारनवर, नितीन खाडे, संदीप राठोड घटनास्थळी दाखल झाले. गेले तीन दिवस या गावच्या हद्दीत तीन मोठे अपघात झाले. सुदैवाने तीन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली.

२४ तास ड्रायव्हिंग

एडगाव येथे शनिवारी झालेल्या अपघातातातील चालक २४ तास बस चालवत होता. शुक्रवारी पहाटे मुंबईहून बस निघाली होती. त्या चालकाला विश्रांती मिळाली नव्हती. अखेर एडगाव येथे शनिवारी पहाटे बस आली असता चालकाचा डोळा लागला आणि गाडी झाडावर जाऊन धडकली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT