water.jpg 
कोकण

घोलवडमधील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने पाण्यासाठी वणवण

अच्युत पाटील

 डहाणु : डहाणु तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत क्षेत्रातील टोकेपाडा भागतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. अवघ्या दोनशे मिटर अंतरावर पाण्याची टाकी असुनही पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या जलस्वराज योजनेतून 2009 साली सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेली जलस्वराज पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. घोलवड पासुन दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अस्वाली धरणातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो आहे. मात्र धरण परिसरात वीज पुरवठा अनियमीत असल्याने जलकुंभ भरले जात नसल्याने गावाला नियमीत पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे ग्रामपंचाती कडून सांगितले जाते.

घोलवड गाव समुद्र किनाऱ्यावर असल्याने परिसरातील विहरीचे पाणी खारट झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षे वणवण करावी लागत असे. 2009 साली पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल आशी अपेक्षा केली जात होती. मात्र पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अलका शशिकांत नारगोळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT