elephant issue konkan sindhudurg 
कोकण

हत्तींचा मुक्‍त संचार डोकेदुखीचा 

प्रभाकर धुरी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - जंगल आणि बागायतीत अनिर्बंधपणे वावरणाऱ्या हत्तींच्या कळपाचा मुक्त वावर आता हमरस्त्यावर देखील सुरू आहे. दोडामार्ग-कोल्हापूर मार्गावरील घाटीवडे येथे रस्ता पार करणाऱ्या तीन हत्तींचा कळप स्थानिक ग्रामस्थांच्या गाडीसमोर आला आणि एकच गोंधळ उडाला. सोमवारी (ता. 1) रात्री 8.40 च्या सुमारास त्यांना तो कळप दिसला. त्यात एक हत्ती आणि दोन पिल्लांचा समावेश होता. 

हेवाळे-घाटीवडे येथील सचिन आणि दत्ताराम देसाई सोमवारी रात्री घरी जात असताना साधारणपणे 8.40 च्या सुमारास तीन हत्तींचा एक कळप त्यांच्या गाडीसमोर आला. त्यांनी घाबरून गाडी थांबवली आणि त्याही परिस्थितीत त्या कळपाचे छायाचित्रही टिपले. असे असले तरी हत्तींच्या अनिर्बंध वावरामुळे तिलारी खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. 
स्थानिक शेतकऱ्यांची हत्तींकडून अपरिमित हानी होत आहे. शेतकरी आंदोलन, उपोषण करत आहेत; पण शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक गावकरी आता आमचे प्राण गेल्यावरच शासनाला जाग येणार का? असा सवाल करत आहेत. 

दोन मादी हत्तींचा वावर 
त्या छायाचित्रात एक हत्ती (मादी असावी) व दोन पिल्ले दिसताहेत. दोन्ही समवयस्क वाटत आहेत. मादी हत्ती एका वेळेला एकाच पिल्लाला जन्म देत असल्याने आणखी एक मादी त्या परिसरात असण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT