farmer issues in konkan sindhudurg
farmer issues in konkan sindhudurg 
कोकण

शेतकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने सोडवा ः ओगले

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -  चांदा ते बांदा योजनेंतर्गत भात पीक स्पर्धेचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. सदोष पर्जन्यमापक यंत्रणेमुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. हे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदा ओगले यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनातून त्यांनी शेतकऱ्यांना चांदा ते बांदा योजनेत भात पीक स्पर्धा अनुदान मिळाले नाही, माकड, जंगली जनावरे शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्याचा बंदोबस्त केला जात नाही. कृषी यांत्रिकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.

पंचक्रोशीतील हवामानाधारित पर्जन्यमापक यंत्र सक्रिय नाहीत. जिल्ह्यातील पर्जन्यमापक यंत्रणा सदोष असल्याने शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे त्यांचे लक्ष वेधले आहे. 
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या वेळी प्रसाद परब, सुनील कामतेकर, विजय कुडपकर, प्रकाश बागवे, नीलेश पेडणेकर, गणेश घाडी, तुकाराम राऊळ, बबलू कदम, मंगेश लोके आदी उपस्थित होते. 

या वेळी दिलेल्या निवेदनातून त्यांनी जिल्ह्यातील बसविण्यात आलेली हवामान पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत करावी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा, जंगली जनावरे, माकड यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. 
गेल्या वर्षी प्रस्ताव करूनही शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. दरवर्षी नवीन-नवीन निकष लावल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. ज्येष्ठता यादीप्रमाणे सुरवातीचे प्रस्ताव प्रथम मंजूर करावेत. शेती अवजारांची जिल्हांतर्गत खरेदी करण्याची जाचक अट रद्द करा. जिल्ह्याबाहेरील अवजारे खरेदीस मान्यता मिळावी, असे निवेदनात नमूद केले आहे. 

तत्काळ भरपाई मिळावी 
अवेळी पावसाने जिल्ह्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानीचा लाभ घेण्यासाठी सात-बारावर भात, आंबा-काजूच्या नोंदी नसल्याने शेतकरी नुकसानीपासून वंचित राहिला आहे. महसूल प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी. तसेच, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे आणि राजरोस होत असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी ओगले यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT