farmers are happy because bamnoli dam is full 
कोकण

बामणोली धरण भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा

लक्ष्मण डूबे

रसायनी (रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरण नुकतच भरून सांडव्यातुन पाणी वाहु लागले आहे. यंदाच्या वर्षी धरण लवकर भरून वाहु लागल्याने जांभिवली पंचक्रोशितील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. 

जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा मणिकगडाच्या पायथ्या़शी हे धरण 35 वर्षा पुर्वी बांधले आहे. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर शेतकरी रब्बी हंगामात भात पिका बरोबर भाजी पाल्याचे पिक घेऊ लागले आहे. सिचंनाचे खात्रीचे साधन मिळाल्याने जांभिवली परीसरात हरीतक्रांती झाली आहे. बारामहिने जनावरांना हिरवा चारा मिळु लागल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यावसाय सुरू केला आहे. दरम्यान या वर्षी धरण लवकर भरून सांडव्यातुन पाणी वाहु लागले आहे. त्यामुळे पंचक्रोशितील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर धरणात पाणी साठ्याची क्षमता 2.48 द.ल.घ.मी असल्याचे सांगण्यात आले. 

यापुर्वी मागील दोन वर्षात धरण 2016 ऑगस्ट मधील पहिल्या आठवड्यात आणि 2017 जुलै मधील तिसऱ्या आठवड्यात भरले होते. असे जानकार शेतकऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT