

Vaibhav Sooryavanshi Injury | RR vs SRH | IPL 2026
Sakal
RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) वैभव सूर्यवंशीने शतकी खेळी करत अनेक विक्रम केले. मात्र असे असले, तरी त्याला अचानक मैदानातून बाहेर जावे लागल्याने राजस्थानची चिंता वाढली आहे. शनिवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना झाला. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या (Vaibhav Sooryavanshi Century) जोरावर राजस्थानने हैदराबादसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा उतरले. पण हेड पहिल्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. मात्र नंतर अभिषेक शर्मा ईशान किशनच्या साथीने डाव सावरत होता.