file of corona duration found in house of doctors in ratnagiri 
कोकण

कुलूप फोडल्यावर मिळाल्या गहाळ फायली ; रत्नागिरीतील प्रकरणाला वेगळेच वळण

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय निवासस्थानाचा प्रश्‍न पाच महिन्यांनंतर कुलूप तोडून निकाली निघाला, मात्र त्यानंतर झालेल्या शासकीय पंचनाम्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेसंदर्भात गहाळ झालेल्या महत्त्वाच्या फायली कपाटात मिळाल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. 

शासकीय दस्तावेज लपवून ठेवणे, हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य संचालकांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुले यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, डॉ. बोल्डे यांची यासंदर्भातील बाजू समजून घेण्यासाठी आज (बुधवारी) सायंकाळी त्यांना अनेकदा फोन करण्यात आला, परंतु त्यांनी फोन स्वीकारला नाही.
निवासस्थानी असेल्या एका कपाटाची झडती घेतली असता, त्यामध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळेसंदर्भातील गहाळ झालेल्या महत्त्वाच्या फायली मिळून आल्या. रुग्णालयाचे अधिकारी आणि डॉ. फुले यांनी त्याला दुजोरा दिला.

सातारा रुग्णालयाच्या अहवालाचा संदर्भ देत तो प्रस्ताव दिला होता. गेली अनेक दिवस या फाईलची शोधा-शोध सुरू होती, मात्र ती मिळत नव्हती. याबाबत बोल्डे यांना वारंवार विचारणा करूनही ती कोठे आहे, ते त्यांनी सांगण्याचे टाळले. शासकीय दस्तावेज अशाप्रकारे आपल्या ताब्यात ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत नोटीसही बजावली होती, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आज कपाटात या शासकीय फायली सापडल्या आहेत. जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा परवानगीशी संबंधित त्या मूळ फाईली आहेत. डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला बदली झाली होती, मात्र त्यांना नियुक्ती मिळत नव्हती. आता ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.

कार्यमुक्त होण्यापूर्वी निवासस्थानाला कुलूप

डॉ. फुले शासकीय निवासस्थान मिळविण्यासाठी गेली चार महिने प्रयत्न करीत होत्या. तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी येथून कार्यमुक्त होण्यापूर्वी या निवासस्थानाला कुलूप लावले होते. निवासस्थानाचे कुलूप तोडण्यात आले. तेव्हा निवासस्थानातील सर्व वस्तूंचे व्हिडिओ शूटिंग आणि पंचनामे करण्यात आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT