bjp, congress
bjp, congress 
कोकण

भाजपची सत्ता उलथवणं कठीण; अचूक व्युहरचनेतून काँग्रेसचं वर्चस्व

सकाळ डिजिटल टीम

पहिल्याच निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस नेत्याने गाजवले वर्चस्व

देवगड : पाच वर्षापूर्वी देवगड जामसंडे नगरंपचायतीच्या (Nagar panchayat) पहिल्याच निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तत्कालीन देवगड ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीची (NCP) आणि जामसंडे ग्रामपंचायतीमधील भाजपची (BJP) सत्ता उलथवणे तसे सोपे नव्हते; मात्र तत्कालीन स्थितीत काँग्रेसमध्ये असलेल्या आमदार नीतेश राणे (Nitesh rane) यांनी अचूक व्युहरचना करीत नगरपंचायतीवर काँग्रेसचे आणि पर्यायाने आपले वर्चस्व प्रस्तापित केले. (Political News)

नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक होण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे तत्कालीन निवडणूकीवेळी १७ जागांसाठी तब्बल ७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये १९ अपक्षांनी अर्ज भरले होते. (Konkan News) त्यामुळे राजकीय पक्षांसमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याची डोकेदुखी वाढली होती. ७६ मध्ये भाजपकडून १७ जणांचे २० अर्ज, काँग्रेसकडून २२ अर्ज, शिवसेनेकडून ६ अर्ज, राष्ट्रवादीकडून ९ अर्ज तर १९ अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

अखेर अर्ज माघारी घेतल्यानंतर १७ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात राहिले. निवडणूक रिंगणात राहिलेल्या ५७ उमेदवारांमध्ये काँग्रेस १७, भाजप १३, शिवसेना ५, राष्ट्रवादी ९ तर १३ अपक्षांचा समावेश होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे कमकुवत दुवे ओळखून आमदार नीतेश राणे यांनी प्रचाराचे रान उठवले. पहिल्याच निवडणूकीत सत्ता कोणाची येणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता ताणली होती. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर १७ पैकी तब्बल १० जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवत प्रस्तापितांना मोठा हादरा दिला.

आमदार राणेंची रणनिती विजयासाठी निर्णायक ठरली. निवडणूकीत भाजपला चार तर शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. निवडणूक झाल्यानंतर विकासाच्या मुद्यावर अपक्ष नगरसेवकाने राणेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर पुढे राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविकेने काँग्रेसशी जवळीक साधली. एकहाती सत्ता असल्याने भाजपच्या चार आणि शिवसेनेचा एक अशा एकूण पाच नगरसेवकांच्या विरोधी भुमिकेला मर्यादा आल्या. पुढे आमदार नीतेश राणे भाजपवासी झाले आणि नगरपंचायतीमधील विरोधाची धार बोथट झाली. त्यामुळे आपणास हवा त्याठिकाणी विकास निधी वळवण्यात सत्ताधाऱ्यांना फारशी अडचण भासली नाही. यातून नागरिकांचे समाधान किती झाले हा वेगळा मुद्दा राहिला.

यांची अलिप्त भूमिका

मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नीतेश राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे सर्व नगरसेवक शिलेदार भाजपवासी झाले; मात्र मुळ भाजपच्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी आपली अलिप्त भूमिका स्विकारत भाजपपासून फारकत घेतली. अलीकडे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नगरपंचायत सभागृहात शिवसेनेचा आवाज घुमला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT