fisherman found a fish of rupees 20 lakh in ratnagiri sarnga fish 
कोकण

एकाच दिवसात नशीब चमकलं ; मच्छीमार झाला लखपती, बंपर माशाची लागली लॉटरी

राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा बंदरातील एका मच्छीमारी नौकेला बंपर सरंगा मिळाला. वीस लाखांहून अधिक किंमतीचा मासा एकाच मच्छीमाराला मिळण्याची महिन्याभरातील पहिलीच वेळ असल्याची चर्चा सुरू होती. बदलत्या प्रवाहामुळे एकाच ठिकाणी ही मासळी मिळाल्याचा अंदाज मच्छीमारांकडून वर्तविला जात आहे.

नैसर्गिक संकटांमुळे यंदाचा मच्छीमारी हंगाम अडचणीत आला आहे. ३१ डिसेंबरपासून पर्ससिननेट बंदीला सुरवात होणार आहे. गेले काही दिवस मतलई वारे वाहत असून थंडीचा कडाकाही वाढलेला आहे. वेगवान वाऱ्यामुळे पाण्यातील प्रवाह पुढे सरकत आहे. परिणामी मासेही रत्नागिरीच्या किनारी भागातून पुढे श्रीवर्धनच्या दिशेने सरकू लागले आहेत.

जयगड किनारपट्टीपासून सुमारे २८ वाव खोल समुद्रात मिरकरवाडा येथील एका मच्छीमारी नौकेला सुमारे ६ टन बंपर सरगा मिळाला. सध्या सरंग्याला बाजारात ३५० ते ४०० रुपये किलो दर मिळत आहे. परप्रांतीय नौकांचा धुडगूस सुरू असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती काहीच लागत नाही. 
त्यामध्ये बंपर सरगा मिळाल्याने संबंधित मच्छीमार लखपती झाल्याची चर्चा मिरकरवाड्यात सुरू आहे.

परंप्रांतीयांचा धुडगूस सुरूच

मतलई वारे वाहत असून थंडीचा कडाकाही सुरू झाला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे प्रवाह बदलतात आणि त्याचा परिणाम मासेमारीवर होतो. प्रवाहाबरोबर माशांचे थवेच्या थवे पुढे सरकतात. सध्या परप्रांतीय मासेमारी नौकांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धुडगूस घातला असून त्याचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसला. अनेक मच्छीमारांना मोजकीच मासळी मिळत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT