Money
Money Google
कोकण

मच्छीमारांच्या खात्यात लवकरच पैसे; सेनेच्या नेत्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग): मच्छीमारांना नुकसान भरपाईपोटी मंजूर केलेल्या विशेष पॅकेजमधून वंचित असलेल्या जिल्ह्यातील मच्छीमार लाभार्थ्यांसाठी शासनाने ३ कोटी ७१ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहे. हा निधी लवकरच संबंधित मच्छीमारांच्या खात्यात जमा होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती मच्छीमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली.

समुद्रात सातत्याने आलेल्या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेजचा लाभ देत दिलासा दिला. या पॅकेज अंतर्गत याआधी ८३१ लाभार्थ्यांना १ कोटी ९० लाखाचा निधी खात्यात जमा केला आहे. यात जिल्ह्यातील काही मच्छीमार लाभार्थी वंचित असल्याने यासाठी आणखी निधी आवश्यक होता. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते.

शासनाकडे वंचित मच्छीमार लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ६४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्ह्याला ३ कोटी ७१ हजार २०० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. या मदतीमुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. यात २००० रापणकर सदस्य, २२० नौकाधारक, ३५०० लहान मासळी विक्रेते अशा एकूण ५ हजार ७२० लाभार्थ्यांना या अनुदानाचा फायदा मिळणार आहे. लवकरच हा निधी संबंधित मच्छीमार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. वंचित मच्छीमारांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मत्स्यमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, मत्स्य आयुक्तांचे श्री. जोगी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT