कोकण

टायनी चिंगळांमुळे मच्छी हंगामाची सुरवात झकास 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होऊ लागल्यामुळे मच्छीमारांनी लाटांवर स्वार होत, मासेमारीला जाण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मिरकरवाडासह विविध ठिकाणच्या बंदरांवरील गजबज वाढली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन मच्छीमार खोल समुद्रात जात आहेत. हंगामाच्या आरंभीला टायनी चिगळांसह पापलेट, सुरमई, मांदेली, ढोमा बोटींना मिळत आहेत. टायनीला मिळणाऱ्या दरामुळे हंगामाची सुरवात समाधानकारक झाल्याचे सांगितले जात आहे. 

शासनाच्या निकषानुसार एक ऑगस्टपासून मासेमारीला सुरवात झाली; परंतु वेगवान वारे, मुसळधार पाऊस यांमुळे समुद्र खवळलेला होता. हवामान विभागाकडूनही मच्छीमारांना सावधानतेचा इशारा मिळाला होता. नारळीपौर्णिमेपर्यंत हवामान प्रतिकूल होते. कोळीबांधवांसह मच्छीमारांनी समुद्राला नारळ अर्पण करून मच्छीमारीला सुरवात केली; पण पाण्याला करंट असल्यामुळे आणि भगवती बंदराजवळ एक नौका बुडाल्याने गिलनेट आणि फिशिंग नौका 100 टक्के समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास धजावल्या नाहीत.

जिल्ह्यात सुमारे तीन हजार नौका असून, त्यांतील 50 टक्‍क्‍यांहून अधिक नौका मासेमारीसाठी जात आहेत. पाण्याला करंट असल्याने नौका हाकणे आणि मासळीसाठी जाळे टाकणे जिकिरीचे असते. सध्या मच्छीमार सकाळी सहा वाजता समुद्रात जातात आणि सायंकाळी परतात. 

गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांना साळू आणि टायनी या प्रकारची चिंगळं मिळत आहेत. साळूला प्रतिकिलो दर 200 रुपये, टायनीला प्रतिकिलो 70 रुपये दर आहे. पापलेट चारशे रुपये किलोने विकला जात आहे. श्रावण असूनही रविवारी (ता. 17) सकाळी मिरकरवाडा बंदरामध्ये मच्छी खवय्यांची गर्दी होती. मासळी कमी असल्याने दरही तेवढेच वधारलेले आहेत; परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे घासाघीस करून मच्छीची खरेदी होत आहे. सध्या फिशिंग, गिलनेटला परवानगी असून, एक सप्टेंबरपासून पर्ससिननेट मासेमारी सुरू होईल. 

""फिशिंगला चिंगळं मिळत आहेत. त्यात टायनी, साळू या प्रकारच्या चिंगळांचा समावेश आहे. अन्य मासळी किरकोळ प्रमाणात मिळतेय. वारा थोडा असल्यामुळे पाण्याला करंट आहे.'' 
- अभय लाकडे,
मच्छीमार, रत्नागिरी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT