Former Guardian Minister Deepak Kesarkar warning Mine owners kokan marathi news
Former Guardian Minister Deepak Kesarkar warning Mine owners kokan marathi news 
कोकण

खाण मालकांनी "त्यांना' भरपाई द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल : दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : निगुडे गावातील 157 घरांना काळा दगड खाणीतील भूसुरुंग स्फोटामुळे तडे गेले आहेत. त्यांना 23 लाख रुपयांची भरपाई खाण मालकांनी येत्या आठ दिवसात देण्याबाबत विचार करावा. अन्यथा संबंधित खाण मालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खाण मालकांना दिला. रवी जाधव स्टॉल संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात उद्या (ता. 26) सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली असल्याची माहिती  केसरकर यांनी दिली. 


येथील तहसीलदार कार्यालयात उपजिल्हाधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निगुडे गावा शेजारील दगड खाणमालक यांची आज बैठक झाली. यावेळी आमदार केसरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, दोडामार्ग नायब तहसीलदार नाना देसाई, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व पदाधिकारी आणि खाण मालक उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी निगुडे गावातील 157 घरांना भेगा गेल्या आहेत. याबाबत उपसरपंच गवंडे यांनी आवाज उठवला आहे. याबाबत उपोषणही छेडले होते. त्यानंतर महसुल विभागाच्या मदतीने त्या घरांचे सर्वेक्षण बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केले आहे. ते सुमारे 23 लाख एवढे झाले आहेत. ते देण्याची जबाबदार खाण मालकांची असताना ते टाळाटाळ करत आहे, अशी कैफियत उपसरपंच गवंडे यांनी मांडली. 


आमदार केसरकर यांनी गंभीर होत लोकांच्या घरांना तडे गेले असताना त्यांना खाण मालकांनी भरपाई देण्यास टाळाटाळ करणे चुकीचे आहे. निगुडे गावाशेजारील खाण मालकांनी तडे गेलेल्या घराची भरपाई लोकांच्या बॅंक खात्यामध्ये टाकायला हवी. त्यासाठी संबंधित खाण मालकांनी एकत्रित येऊन तडे गेलेल्या घरांच्या मालकांना भरपाई द्यावी, असे या बैठकीत ठरले आहे. असे आमदार केसरकर यांनी दिली. 


उपसरपंच गवंडे म्हणाले, "आमदार केसरकर यांनी खाण मालकांना लोकांच्या घरांची भरपाई द्यावी म्हणून निर्देश दिले आहेत. अन्यथा मी हा प्रश्‍न विधिमंडळामध्ये उपस्थित करेन. यामुळे लोकांना न्याय मिळेल. येत्या आठ दिवसात खाण मालकांनी भरपाई देण्याबाबत आमदार केसरकर यांनी संबंधित खाण मालकांना इशारा दिला आहे. मी उपसरपंच या नात्याने गावातील लोकांच्या पाठिंब्याने इशारा आहे.''  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT