कोकण

बिबट्याच्या कातड्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - बिबट्याच्या कातड्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून तीन लाखांचे कातडे जप्त केले आहे. पोलिस पाचव्या संशयिताचा शोध घेत आहेत. 

याबाबत चिपळूणचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सावर्डे दहिवली मार्गावरील कुंभारवाडीत राहणारे शशिकांत धोंडू देसाई (वय ६५) आणि त्यांचा मुलगा कमलेश (३१) काल सायंकाळी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कामथे घाटात नाकाबंदी केली होती. सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान दोघे चारचाकी गाडीने कामथे घाटात येताच पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. वाहन तपासल्यानंतर त्यात बिबट्याचे कातडे सापडले. देसाईंनी सुरवातीला बिबट्याचे कातडे असल्याचा इन्कार केला.

कुत्र्याचे कातडे असून, त्याला रंगविले आहे, असे तो पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी कातड्याची खात्री करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले. परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. देसाईंकडून जप्त केलेले कातडे बिबट्याचेच असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. कातडे कोठून आणले, याची पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली तेव्हा कुटरे गावातील सुनील गोपाळ सावरटकरने आम्हाला दिल्याचे देसाई यांनी सांगितले. 

सावरटकर कुटरे गावात सुतारकाम करतो. पोलिसांनी सावरटकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कातडे त्याला संजीवकुमार पद्माकर गुजर (४०, रा. कुटरे) याने दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुजर याला ताब्यात घेतले. 

ते बिबट्याचे कातडे कोणाला विकण्यासाठी आणले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चौघांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याच्या कातड्यासाठी तीन लाखांचा व्यवहार झाला होता. त्यासाठी संबंधित व्यक्तीने तीन लाखांचा धनादेशही दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. 

यापूर्वी कोणते गुन्हे आहेत का?
चिपळूण पोलिसांनी पकडलेल्या संशयितांवर यापूर्वी कोणते गुन्हे आहेत का, किती वर्षांपासून बिबट्याच्या कातड्याची तस्करी सुरू आहे, ते कोठे पाठवले जाते, या संदर्भात पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT