Friends Murder In Debate On Chewing Tobacco Sindhudurg News
Friends Murder In Debate On Chewing Tobacco Sindhudurg News 
कोकण

तंबाखू देण्याच्या वादातून सिंधुदुर्गात मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - तंबाखू देण्यावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राला संपविल्याचा धक्कादायक प्रकार आरोंदा येथे घडला. तंबाखू न दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून मित्रानेच मित्राचा धारदार चाकूने भोसकून खून केला.

बुधवारी (ता.6) रात्री नऊच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात आरोंदा खासकीलवाडा येथील स्वप्नील दिगंबर जोशी (वय 32) याचा मृत्यू झाला. त्यानंतर पसार झालेला दिलीप वासुदेव मोर्जे (वय 55, रा. आरोंदा शिपेतुवाडा) याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. 
सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - आरोंदा येथील जोशी व मोर्जे काल (ता.6) सायंकाळी 7.45 च्या सुमारास आरोंदा बाजारपेठेत एकत्र होते. यावेळी जोशीने मोर्जेकडे तंबाखू मागितला; मात्र त्याने तो देण्यास नकार दिला. तंबाखू न दिल्याने या दोघांमध्ये वादावादी झाली. जोशीने मोर्जेची कॉलर पकडली. त्यानंतर वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी बाजारपेठेतील नागरिकांनी दोघांना बाजूला करून घरी पाठवले; मात्र झाल्या प्रकाराचा राग मनात ठेवून रात्री नऊच्या सुमारास जोशी मोर्जेला जाब विचारण्यासाठी निघाला. आरोंदा शिपेतुवाडी येथील वासुदेव तारी यांच्या घरासमोरील रस्त्यावर दोघे पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. यावेळी मोर्जेने जोशीच्या छातीवर व मांडीवर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यात जोशी गंभीर जखमी झाला. 

जखमी जोशीला गोवा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत जोशीचे वडील दिगंबर कृष्णा जोशी यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोर्जेला आज सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

मोर्जे याची मुंबई येथे पानाची टपरी होती. दोन वर्षांपूर्वीच तो आरोंदा येथे आला होता. त्यानंतर जोशी व त्याची मैत्री झाली होती. दोघेही बाजारपेठेत एकत्रच दिसायचे. रोजच्याप्रमाणेच बुधवारी (ता. 6) सायंकाळीही दोघे एकत्र होते. याचवेळी किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून मित्रानेच मित्राचा खून केला. पोलिसांनी मोर्जेकडून चाकू व गुन्हा करताना त्याच्या अंगावर असलेले कपडे पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT