future of water sports in konkan business man is problematic due to corona 
कोकण

बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे तरी कसे ? व्यावसायिकांपुढे उभारलायं प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडून किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ला परवानगी मिळाली; मात्र मेरी टाईम बोर्डाला मंत्रालयीन स्तरावरून आदेश प्राप्त न झाल्यामुळे ऐन पर्यटन हंगामात वॉटर स्पोर्टस्‌ बंद ठेवण्याचे संकट उभा ठाकले आहे. दोन हंगाम वाया गेले. आता तिसरा हंगामही परवानगीत अडकला आहे. बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्‍न व्यावसायिकांपुढे आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. सरत्या दिवाळीत मंदिरे सुरू झाली आणि पर्यटन व्यवसायाला झळाळी मिळाली. गणपती पुळेच्या समुद्र किनाऱ्यावर दररोज चार ते साडेचार हजार पर्यटकांची मंदियाळी सुरू झाली. गुहागर, दापोलीसह रत्नागिरी तालुक्‍यातील अनेक ठिकाणी गर्दी आहे.

वॉटर स्पोर्टस्‌ सुरू झाले पण तीनच दिवसात मेरी टाईम बोर्डाकडून ते बंद करण्याच्या सूचना आल्या. रत्नागिरीसह रायगडपर्यंत याची कडक अंमलबजावणी झाली. जिल्हाप्रशासनाने मेरी टाईम बोर्डाच्या परवानगी कोरोनाचे निकष पाळून खेळ सुरू करा अशा सूचना दिल्या होत्या; परंतु मेरीटाईम बोर्डाला त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश प्राप्त न झाल्यामुळे खेळ बंद ठेवावे लागले आहेत. दिवाळीच्या सुटीनंतर पर्यटन हंगामाला चालना मिळाली असली तरीही वॉटर स्पोर्टस्‌ बंद राहिल्यामुळे चालकांचे दिवाळं निघाले आहे.

लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर सर्वच व्यवसाय व जीवनावश्‍यक गोष्टींना शासन परवानगी देत असताना वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांना केवळ नियम व अटींची बंधने लागू करून बंदर खात्याकडून टांगती तलवार आणली जात असल्याने पर्यटकांनाही वॉटरस्पोर्टची प्रतीक्षाच आहे. पर्यटन सुरू झाले असून एकाच गाडीत बसून पन्नास माणसे एकत्र येतात. पण समुद्रात फेरी मारणाऱ्या बोटीत कुटुंबातीलच ६ माणसे एकत्र बसण्यास परवानगी नाही. 

आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, गुहागर, दापोली तालुक्‍यातील मुरुड यांसह बऱ्याच किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ सुरु आहे. प्रत्येकाला २० ते २५ हजार रुपयांचे हप्ते भरावे लागत आहेत. १५ ते १६ लाखांची जेट स्की खरेदी केली आहे. ते चालवणारा कामगार तांत्रिक तज्ज्ञ असतो. हप्त्यासाठी बॅंकवालेही थांबत नाहीत. शासनाने याचा सारासार विचार करावा.

- उदय पाटील, अध्यक्ष वॉटरस्पोर्ट व्यावसायिक संघटना, गणपतीपुळे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune Research Students Protest: संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा राज्य सरकारवर आरोप, तीव्र असंतोष

Minister Bharat Gogawale:'मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल'; विकासकामांचे लोकार्पण; रॅलीद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

SCROLL FOR NEXT