कोकण

ऐक्‍याच्या प्रतीकाची ओळख ‘मराठ्यांचा पीर’

अमोल टेंबकर

सावंतवाडी - हिंदू, मुस्लिम धर्मीयांच्या ऐक्‍याचे प्रतीक अशी येथील सरदार निंबाळकर पिराची ओळख आहे. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला हा पीर आजही सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे ‘मराठ्यांचा पीर’ अशीही याची ओळख आहे.

पीर म्हणजे मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान. नवीन वर्षाची सुरुवात मोहरमने होते. त्यावेळी मुस्लिम धर्मीयांकडून पीर पुजले जातात. मात्र, शहरातील सरदार निंबाळकर पीर याला अपवाद आहे. येथील सालईवाडा भागात असलेला सरदार निंबाळकर पीर गेली अनेक वर्षे मुस्लिमांबरोबरच हिंदू धर्मीयांकडूनही पूजला जातो. येथे गूळ, धूप, अगरबत्तीचा नैवेद्य दाखविला जातो.

मोहरम दरम्यान येथे अकरा दिवस उत्सव चालतो. या पिरांचा इतिहास सावंतवाडी संस्थानशी जोडलेला आहे. सरदार निंबाळकर यांना हे पीर मिळाले होते; मात्र आपण धर्माने हिंदू असल्यामुळे पिरांची पूजा कशी करावी, असा प्रश्‍न निंबाळकर यांना पडला. त्यामुळे त्यांनी मुस्लिम सहकाऱ्यांकडून याचे पूजन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या अखत्यारित असलेल्या जमिनीत या पिराचे पूजन करण्यासाठी खास जागा उपलब्ध केली. गेली अडीचशे वर्षे या पिराचे पूजन निंबाळकर कुटुंबीयांमार्फत सुरू आहे.

याबाबत ॲड. संदीप निंबाळकर म्हणाले, की याची एक आख्यायिका आहे. त्या वेळी निंबाळकर घराण्यात वारस जन्माला येत नव्हता. त्यामुळे या पिराला नवस बोलण्यात आला. त्यानंतर घराण्याला वारस मिळाला. नवस फेडण्यासाठी निंबाळकर घराण्यातील एक व्यक्ती या पिराच्या ठिकाणी एक दिवस पूजाअर्चा करते. पाच घरात भिक्षा मागून त्याचा नैवेद्य त्याठिकाणी केला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत निंबाळकर घराणे शेतीच्या निमित्ताने बेळगाव येथे गेल्याने या परंपरेत खंड पडला आहे. परंतु, अन्य हिंदू-मुस्लिम धर्मीयांकडून ही परंपरा आजही जपली जात आहे.’

भवानी देवीच्या भेटीला पीर
सावंतवाडीत मुस्लिम धर्मियांचा असलेला पीर हिंदू धर्मियांच्या भवानी देवीला भेटण्याचा सोहळा असतो. याबाबतच्या आख्यायिकेप्रमाणे कळसुलकर हायस्कूलमध्ये असलेल्या भवानी मंदिरात पीराच्या पतवा ठेवल्या जात असत. त्यामुळे त्याठिकाणी भवानी देवीला भेटण्याची प्रथा आहे, असे तेथील प्रमुख मानकरी शेख यांचे म्हणणे आहे.

विहिरीत सापडले होते पंजे
पीर म्हणून पूजले जाणारे पंजे विहिरीत सापडले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. यानंतर ते चोरीला गेले; परंतु तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या राजांनी स्वखर्चाने ते पुन्हा तयार करून दिले. त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे व या पिराचे नाते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT