कोकण

राज्यभरातून 3 लाखांवर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची अपूर्ण कामे, ठिकठिकाणचे खड्डे, धुवाँधार पाऊस, महागलेले पेट्रोल-डिझेल आदी विघ्नांवर मात करत राज्यभरातून सुमारे तीन लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्‍यता आहे. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्‍याने मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत. दरम्‍यान, नियमित आणि गणेशोत्‍सव विशेष गाड्या देखील फुल्‍ल आहेत. कोकण रेल्‍वेच्या एकेरी मार्गावर वाहतुकीचा ताण असल्‍याने सर्वच रेल्‍वे गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत.

सिंधुदुर्गातील चौपदरीकरण पूर्ण झाल्‍याने चाकरमान्यांचा खारेपाटण ते बांद्यापर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे चाकरमानी जिल्ह्यात फिरकले नव्हते. यंदा मात्र दुप्पट उत्‍साहाने चाकरमानी रेल्‍वे, खासगी बस आणि आपापल्‍या वाहनांतून जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे.

गतवर्षी कोरोनामुळे रेल्‍वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्‍वे मार्गावर तब्‍बल २२४ गणेशोत्‍सव विशेष गाड्या सोडण्यात आल्‍या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्‍ल झाले. या विशेष गाड्या तीन सप्टेंबरपासून जिल्ह्यात येत आहेत. मुंबईतून एस.टी.च्या ९० हून अधिक बस जिल्ह्याच्या विविध आगारात दाखल झाल्‍या. आज रात्री आणि उद्या सायंकाळपर्यंत आणखी बस जिल्ह्यात येणार असल्‍याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात खासगी वाहनाने देखील सहकुटुंब चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यात रायगड, रत्‍नागिरीतील मार्ग खड्डेमय असल्‍याने अनेक चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गाला पसंती दिली आहे. यंदा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्‍याने कुठेही फारशी वाहतूक कोंडी झालेली नाही.

यंदा जुलैमध्ये अतिवृष्‍टीसदृश पाऊस झाला. त्‍यानंतर ऐन गणेशोत्‍सवाच्या तोंडावर मुसळधार सरी कोसळत आहेत; मात्र या विघ्नांची पर्वा न करता जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. फटाके आणि शोभेच्या वस्तू, किराणा दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्‍स तसेच फिरते फळ, भाजी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होत असून जिल्ह्यातील बाजारपेठांत कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

रेल्वेला प्राधान्य

कोकण रेल्वेमार्गावर २२४ विशेष गाड्या सोडण्यात आल्‍या आहेत. आत्तापर्यंत ८४ विशेष गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्‍या आहेत. जुलैमधील अतिवृष्‍टी तसेच गेले चार दिवस मुसळधार पाऊस होत असला तरी रेल्वेमार्ग निर्धोक असल्याने चाकरमान्यांनी कोकण रेल्वेच्या सेवेलाच अधिक पसंती दिली आहे. दरम्‍यान, गणेशोत्‍सवात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी एस.टी. प्रशासनाने दोनशेहून अधिक गाड्या सज्‍ज ठेवल्‍या आहेत.

* रेल्‍वेतून एक लाख प्रवासी सिंधुदुर्गात

* खासगी आराम आणि एस.टी.तून ५० हजार प्रवासी दाखल

* खासगी वाहनातूनही हजारो प्रवासी दाखल

* आणखी दीड ते दोन लाख चाकरमानी येण्याची शक्‍यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT