पोट कालव्यांच्या पूर्णत्वाची डेडलाईन द्या : रोणापल सरपंच sakal
कोकण

पोट कालव्यांच्या पूर्णत्वाची डेडलाईन द्या : रोणापल सरपंच

निलेश मोरजकर

बांदा : विलवडे, रोणापाल, निगुडे आदी गावात जाणार्‍या कालव्याचे काम पुर्ण न करता तसेच कालवे सुरू न करता त्या ठिकाणी असलेल्या पोट कालव्याचे काम सुरू करु नये, अशी मागणी संबधित गावच्या सरपंचानी तिलारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांच्याकडे केली. कालव्याचे काम कधी पुर्ण केले जाणार याबाबत आम्हाला डेडलाईन द्या, वारंवार तारखा पुढे नेवून शेतकर्‍यांची फसवणूक करू नका, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी यावेळी दिला.

श्री. गावडे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी श्री. कोरे यांची भेट घेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी कोरे यांच्याशी चर्चा केली. गेल्या २२ वर्षापुर्वी या ठिकाणी कालव्यासाठी शेतकर्‍यांकडुन कवडी मोलाने जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत; मात्र अद्यापपर्यत गावात पाणी आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. या ठिकाणी येणारा प्रत्येक अधिकारी तुम्हाला पाणी मिळणार, असे आश्वासन देतो; परंतु प्रत्यक्षात मात्र कालवे फुटीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शेतकरी मात्र पाण्याविना आहेत तर दुसरीकडे कालव्याची कामे अपुर्ण असताना पोट कालव्याची कामे केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फटका बसत आहे.

शेतात चर खोदून ठेवण्यात आल्याने शेती बागायतीत जायचे कसे? गुरांना न्यायचे कसे? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे एक तर कामे कधी होणार याची डेडलाईन द्या, अन्यथा कालवा सुरू झाल्यानंतर पोट कालव्याची कामे हातात घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत आपण आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेवू शेतकर्‍यांना त्रास होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे श्री. कोरे म्हणाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती कृष्णा सावंत, निगुडे सरपंच समिर गावडे, प्रकाश वालावलकर, रमेश गावकर, उदय देउलकर, सखाराम गावडे, महादेव गावडे, यशवंत जाधव, भिकाजी केणी, वसंत धुरी, धाकू बोर्ये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT