Glory to famous actor Digambar Naik 
कोकण

मालवणी माणूस "ब्रॅण्ड अम्बॅसिडर' 

नेत्रा पावसकर

तळेरे (सिंधुदुर्ग) - मालवणीमुळे बोलबाला निर्माण करणाऱ्या इन्सुली (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांचा भारतीय डाक विभागाचा "ब्रॅंड अम्बासिडर' म्हणून गौरव झाला. याबद्दल त्यांच्या पोस्टाच्या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. जागतिक टपाल दिनानिमीत्त भारतीय डाक विभागाकडून सुरू असलेल्या राष्ट्रीय डाक सप्ताहात नाईक यांच्या पोस्ट तिकिटचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी वारगांव (ता. कणकवली) येथील विजय केसरकर यांचा फोटो असलेली पोस्टाची तिकिटे काढून त्यांचाही विशेष सत्कार झाला. मुंबई येथील जनरल पोस्ट ऑफिस दादर येथे हा कार्यक्रम पार पडला. 

अशाप्रकारे देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान प्राप्त झाला होता; मात्र मालवणी सुपुत्राचा असा प्रथमच गौरव करण्यात येत आहे. सिंधुदुर्गच्या मातीतील दिगंबर नाईक यांनी आपल्या अभिनयाने कलाक्षेत्रात, चित्रपट-नाट्यक्षेत्रात एक वेगळाच मानदंड प्रस्थापित केला आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांची मने जिंकणारे, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध असणारे दिगंबर नाईक यांच्या फोटोसह असेलल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन ही अवघ्या जिल्ह्याला अभिमानाची बाब आहे. 

दिगंबर नाईक यांचा फोटो असलेली 500 रुपयांची तिकिटे विक्रीसाठी आली आहेत. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला पोस्टचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. पठारे, एस. एल. परब, बाळा चौकेकर, सुरेंद्र पालव आदी उपस्थित होते. शालेय जीवनापासूनच अभिनयची आवड असणाऱ्या दिगंबर नाईक यांनी अभिनयासाठी मुंबई गाठली.

विशेष म्हणजे अभिनय करताना मालवणी बाज कायम ठेवला. जिथे संधी मिळेल तिथे मालवणी भाषा आवर्जुन बोलायची, हा त्यांचा शिरस्ता आहे.  "विच्छा माझी पूरी करा', "भटाच्या साक्षीने', "अर्धी मस्ती अर्धा ढॉंग', "मिस्तर नामदेव म्हणे', "लाडीगोडी' यासारखी अनेक नाटके तर "गाव गाता गजाली', "फू बाई फू', "बिग बॉस' यासारखे अनेक रिआलीटी शो आणि अनेक चित्रपटांतून त्यांचा अभिनय पहायला मिळाला. अनेक महोत्सवातून त्यांच्यातील अस्सल मालवणी कलावंत पहायला मिळतो. 

कणकवली तालुक्‍यातील वारगाव येथील विजय केसरकर सध्या एच.पी.सी.एल. मध्ये सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांची सुरुवात पोस्ट कार्यालयातून 1982 मध्ये झाली. आणि आता ते एचपीसीएल सारख्या कंपनीत बड्या हुद्‌द्‌यावर कार्यरत असून ते सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबद्दल यावेळी केसरकर यांचा गौरव करण्यत आला. 

सिंधुदुर्गतील छोट्याशा गावातून अभिनयासाठी मुंबईला आलो. अभिनय करताना मालवणी टिकली पाहिजे, असे मनोमन वाटायचे, त्यासाठी संधी मिळेल तिथे मालवणीचा आग्रह धरला. खरं तर हा सन्मान मालवणी भाषेचा असून त्याचा सर्वाधिक आनंद वाटतो. 
- दिगंबर नाईक 

मुंबईमध्ये आलो त्यावेळी सर्वप्रथम पोस्ट कार्यालयात कामाला होतो. दिगंबर जठार यांच्यामुळे मुंबईला आलो. मला भारतीय पोस्ट खात्याचा अभिमान आहे. तिथून माझी सुरुवात झाली आणि आज एका बड्या कंपनीत सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. 
-विजय केसरकर 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT