medical
medical 
कोकण

'गोवा बांबूळी येथील रुग्णालयात कायम निशुल्क सुविधा देण्यासाठी प्रयत्न'

अमोल टेमकर

सावंतवाडी - 'गोव्याच्या बाहेरच्या रुग्णांना गोवा बांबूळी येथील रुग्णालयात कायम निशुल्क सुविधा देण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे. इतकी वर्षे सुरू असलेली सेवा शुल्क लावून बंद करू नये, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे करणार आहे. ते सुध्दा या भूमिकेबाबत सकारात्मक आहेत,' असा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज (शुक्रवार) येथे केला.

नाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. यावेळी  त्यांनी सावंतवाडी पालिकेला भेट दिली. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, "आजपर्यंत ही सुविधा मोफत दिली जात होती. एक डिसेंबरपासून सशुल्क सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा. इतकी वर्षे सुरू असलेली सेवा तशीच कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. आवश्यक असल्यास काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.''

यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक आनंद नेवगी अनारोजीन लोबो बाबू कुडतरकर,शुभांगी सुकी, भारती मोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT