Sperm whale vomiting
Sperm whale vomiting Sakal
कोकण

उलटी तस्करीचा मुख्य सूत्रधार गोव्याचा: बांदा पोलिसांसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा

बांदा : व्हेल माशाच्या उलटी तस्करीप्रकरणी बांदा पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. यातील मुख्य सूत्रधार हा गोव्यातील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आपल्या तपासाचा रोख गोव्याच्या दिशेने वळविला आहे.

ताब्यात असलेल्या तिघा संशयितांमधील एकाकडे गेले दीड वर्ष हा मुद्देमाल होता, असे तपासाअंती समोर येत आहे; मात्र त्याच्याकडे उलटी देणारा तो गोव्यातील मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास करण्याचे मोठे आव्हान बांदा पोलीसांसमोर आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचा पथकाने बांदा येथे गोव्यातील कॉन्स्टंटटिनो फिलोमेनो फर्नांडिस, जुजू जोस फेरीस व तनिष उदय राऊत या तीन युवकांना शनिवारी (ता.११) अटक केली होती. तिघांनाही न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.

याचा तपास बांदा पोलिसांकडे देण्यात आला. बांदा पोलीस मुळापर्यंत जाण्यासाठी बांदा पोलीस कसून चौकशी करीत आहेत. तपासात विविध बाबी समोर येत आहे. तिन्ही सशियत पोलिसांना संदिग्ध माहिती देत आहेत. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. तरीही बांदा पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी वेगळा फॉर्म्युला वापरत आहेत. त्यानुसार लवकरच त्या सूत्रधारलाही गजाआड करतील कि नाही हे समोर येईल.

स्थानिक गुन्हा अन्वेषणतर्फे बनावट ग्राहक

यातील एका संशियताकडे सदरची उलटी गेले दीड वर्ष होती. याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला लागली तर ते त्याला गिऱ्हाईक शोधत असल्याची कुणकुण महिनाभरापूर्वी लागली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने स्वतः डमी गिऱ्हाईक बनले व त्यांना मुद्देमाल घेत बांदा येथे पाचारण केले; मात्र संशयीत खात्री करण्यासाठी बांद्यात आले आणि फसले.

दीड वर्ष होती उलटी

तपासात यातील एका संशयिताकडे गेले दीड वर्ष सदरची उलटी होती, असे समोर येत आहे; मात्र त्याच्याकडे उलटी आणून देणारा कोण? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT