Gold Medal In Mathematics To Devrukh Native Gayatri Joshi
Gold Medal In Mathematics To Devrukh Native Gayatri Joshi  
कोकण

देवरूखच्या गायत्रीला गणितात सुवर्णपदक 

सकाळवृत्तसेवा

देवरूख ( रत्नागिरी ) - मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमएससी अंतिम परीक्षेत गणित विषयात सर्वप्रथम येत सुवर्णपदक प्राप्त करण्याचा बहुमान येथील गायत्री माधव जोशी हिने मिळवला आहे. उद्या (ता. 31) गायत्रीला मुंबई विद्यापीठाच्या समारंभात सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे गणित सोपे करून शिकण्याची आवड निर्माण करण्याची तिची आकांक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला कौतुक आणि अभिमान वाटेल, असे हे यश असल्याची प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहे. 

गायत्रीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं. एकमध्ये तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल देवरूख येथे झाले. आठवीत मयूर भाटकर सर गणित शिकवायला होते. त्यांची गणित शिकवण्याची पद्धत एवढी चांगली होती की, मला गणिताची आवड निर्माण झाली. याच विषयात करियर करायचे ठरवून मी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

पुढे बीएससी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे गणित विषय घेऊन पूर्ण केले. एमएससी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केल्याची माहिती गायत्री जोशीने दिली. 

गायत्रीची आई मृणाल गृहिणी असून वडील माधव जोशी साडवली येथील डलर कंपनीमध्ये सेवेत आहेत . तिच्या यशात आई-वडिलांसह सर्व मार्गदर्शक शिक्षकवर्गाचा मोठा सहभाग असल्याचे गायत्रीने सांगितले . देवरूख वरची आळीतर्फे तिचा नुकताच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला . 

गणिताची प्राध्यापक होणार 
गणित शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटते; मात्र ज्याचे गणित चांगले त्याला स्वतःच्या आयुष्याचे गणित सोडविणेदेखील सहज शक्‍य होते. नेट सेट परीक्षा देऊन गणिताचा प्राध्यापक बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गायत्रीने सांगितले. 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT