कोकण

गोवळकोट जिल्हा परिषद शाळा पुन्हा मंदिरात 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - गोवळकोट जिल्हा परिषद शाळा मोकळी करून द्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला होता. मात्र, शाळा ज्या देवळात भरते. त्या श्री. देव करंजेश्‍वरी व श्री देव सोमेश्‍वर देवस्थान समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे यावर्षी पुन्हा मंदिराच्या सभागृहात गोवळकोट जिल्हा परिषद शाळा भरली आहे. 

गोवळकोट जिल्हा शाळेत सध्या वास्तव्य असलेल्या बौद्धवाडीतील दरडग्रस्त कुटुंबीयांच्या स्थलांतराची समस्या 6 महिने लांबणीवर पडली तरी ती कायम आहे. शहरातील गोवळकोट कदमवाडीतील 15 कुटुंबांना दरडीचा धोका असल्याने या कुटुंबाचे 2016 मध्ये स्थलांतर केले होते. यातील 9 कुटुंबे गेल्या तीन वर्षापासून गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत वास्तव्य करीत आहेत. तर शाळेतील विद्यार्थ्यांना श्री देव करंजेश्‍वरी व श्री देव सोमेश्‍वर देवस्थान मंदिराच्या सभागृहात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून शालेय व्यवस्थापन समितीने शाळेची इमारत पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. दरडग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर करून शाळेची इमारत ताब्यात न दिल्यास मुले शाळेत न पाठविण्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. देवस्थानचे पदाधिकारीही सभागृह मोकळे करून देण्याची मागणी करीत होते. जोपर्यत योग्य जागेत स्थलांतर होत नाही, तोपर्यंत शाळा न सोडण्याचा निर्णय दरडग्रस्त कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे स्थंलातराचा तिढा निर्माण झाला होता. 
 
तहसीलदारांनी काढला सुवर्णमध्य 

तहसीलदार जीवन देसाई यांनी देवस्थानचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती व दरडग्रस्थांची संवाद साधला. तहसीलदारांनी सुवर्णमध्य काढला. पावसाळ्याच्या कालावधीत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती देवस्थान समितीला केली. समितीने ती मान्य केल्याने देवस्थान सभागृहात गोवळकोट जिल्हा परिषद शाळा नियमित भरू लागली. या शाळेत पहिली ते सातवी दरम्यान 22 विद्यार्थी शिक्षण घेत असून चार शिक्षक कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT