gram panchayat election Crowd at Devrukh for filing applications 
कोकण

अर्ज भरण्यासाठी देवरूखात गर्दी: ४४ ग्रामपंचायतींमधून एकूण १९८ अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

देवरुख (रत्नागिरी) :  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना अर्ज दाखल करण्याकरता देवरुख तहसील कार्यालयासमोर एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. पोलिस मैदानावर चारचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. सोमवारी ४४ ग्रामपंचायतींमधून एकूण १९८ अर्ज दाखल झाले. 


१५ जानेवारी रोजी होवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी संगमेश्‍वर तालुक्‍यातील इच्छुकांची सध्या धावपळ सुरु आहे. महा-ई सेवा केंद्र, सेतू कार्यालय आणि आनलाईन अर्ज भरुन देणारे सेंटरमध्ये गर्दी करत आहेत. सध्या आनलाईन केंद्राचे काम मात्र जोरात सुरू आहे. ३० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. आता फक्‍त दोनच दिवस उरल्यामुळे इच्छुक उमेदवारांची एकच घाई होत आहे. तालुक्‍यातील ८१ गामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात कशा राहतील, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसताना दिसत आहेत. 


मंगळवार व बुधवार हे अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस आल्याने या दोन दिवशी अधिकच गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. आता ८१ ग्रामपंचायतीपैकी किती ग्रामपंचायतींवर गावपॅनलचा झेंडा फडकणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून २४ रोजी ५ ग्रापंचायतीमधून १३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर सोमवारी ४४ ग्रामपंचायतीमधून १९८ एवढे अर्ज दाखल झाले. आजपर्यंत एकुण २११ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याकरिता शेवटचे दोन दिवस बाकी असल्याने गर्दी होणार हे गृहित धरुन तहसील प्रशासनाने सेतू कार्यालयाचा वेळ वाढवून दिल्यामुळे तालुक्‍यातून समाधान व्यक्‍त होत आहे.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT