gram panchayat election kudal taluka
gram panchayat election kudal taluka 
कोकण

कुडाळात 69 जागांसाठी चुरस, मतदान शांततेत

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी 65 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 4 जण बिनविरोध निवडून आल्याने 69 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 

तालुक्‍यात माड्याचीवाडी, गोवेरी, गिरगाव-कुसगांव, पोखरण-कुसबे, कुपवडे, वसोली, गोठोस, वाडोस, आकेरी या 9 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. यामध्येही खास करून शिवसेना व भाजप पक्षाच्या वतीने मोठी ताकद लावली आहे. भाजपच्या झेंड्याखाली असलेल्या वसोली ग्रामपंचायतमध्ये 7 जागांसाठी 14 जण रिंगणात उभे आहेत. याठिकाणी दुपारच्या सत्रात 60 ते 65 टक्के मतदान झाले. याठिकाणी 75 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या . 

कुपवडे ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी शिवसेना आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नात आहेत. याठिकाणी सरासरी 70 टक्के मतदान झाले. आकेरीमध्ये 9 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत.

गोवेरी ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत असुन मनसेने एका वार्डमध्ये 1 उमेदवार उभा केल्यामुळे या वार्डमध्ये तिरंगी लढत होणार आहे. याठिकाणी 80 टक्के मतदान झाले. वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाले. पोखरण-कुसबे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधुन विजय सोनु म्हाडेश्वर बिनविरोध झाल्यामुळे आता 8 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत.

याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. गोठोस ग्रामपंचायतीमधील 9 जागांसाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीत 1 जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 8 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे. गिरगाव-कुसगावच्या 7 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तीन जागांसाठी 8 उमेदवार आहेत. याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. शिवसेना, भाजपसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. पक्षपातळीवर ही निवडणूक सर्वांनीच प्रतिष्ठेची केली आहे. 

बिनविरोध विजयी उमेदवार 
पोखरण-कुसबे प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजय सोनु म्हाडेश्‍वर, गोठोस प्रभाग क्रमांक 1 मध्ये वैशाली भितये व वैशाली धुरी माड्याचीवाडी प्रभाग क्रमांक 3 मध्ये कांचन डिचोलकर, असे एकुण चार उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT