grampanayat elaction shivsena dominated cause by 13 grampanchayt in rajapur ratnagiri 
कोकण

निवडणुकीचा फड उद्यापासून रंगणार ; निकालापूर्वीच १३ ग्रामपंचायतींवर सेनेचा दावा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तालुक्‍यामध्ये जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (४) शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वीच ५१ पैकी १३ ग्रामपंचायतींवर ‘भगवा’ फडविण्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामध्ये बिनविरोध झालेल्या नऊ ग्राअश आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा फड उद्यापासून खऱ्या अर्थाने रंगणार असताना ५१ पैकी तेरा ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखल्याचा दावा शिवसेनेकडून केला आहे. त्यामध्ये बिनविरोध झालेल्या उन्हाळे, फुपेरे, पांगरी खुर्द, कारवली, निवेली, शिवणे खुर्द, वाल्ये, पडवे आणि परटवली ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नऊ व्यतिरिक्त मोसम, महाळुंगे, तारळ आणि आडवली या चार ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्याही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याचा दावा सेनेने केला आहे. यासाठी आमदार डॉ. साळवी यांच्या नेतृत्वाखाली महिला उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे, योगिता साळवी, विश्वनाथ लाड, तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, विभागप्रमुख गणेश तावडे, कमलाकर कदम, वसंत जड्यार, नरेश शेलार, नरेश दुधवडकर, संतोष हातणकर आदींनी विशेष प्रयत्न केले.

७७४ उमेदवारी अर्ज वैध 

तालुक्‍यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३९७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ ला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ७७४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (४) शेवटचा दिवस असून त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. किती उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT