कोकण

सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात गुलमोहराची भर

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सिंधुदुर्गनगरीचा दिवस उजाडला जातो.

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या गुलमोहराची झाडे सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर घालीत आहेत. दिवसभर रस्त्यावर सावली देणारी ही झाडे रात्रीच्या वेळी विविध पक्षांसाठी आसरा ठरत आहेत.

जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीच्या निर्मितीनंतर येथील रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. ही झाडे जसजशी मोठी झाली तशी येथील सौंदर्यात भर पडली आहे. नेहमीच हिरवीगार आणि वसंत ऋतूत पिवळ्या, लाल फुलांनी बहरणारी ही झाडे पक्षांचेही आकर्षण ठरत आहेत. येथील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे रस्त्यावर दिवसा सावली आणि थंड हवा देणाऱ्या या झाडांवर रात्रीच्या वेळी विविध पक्षांचे थवे झाडांचा आसरा घेत आहेत.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सिंधुदुर्गनगरीचा दिवस उजाडला जातो.

लागवडीनंतर या झाडांची जोपासना आणि संगोपनही करण्यात आले. त्यामुळे आज ही झाडे पंचवीस वर्षांनंतरही डौलाने उभी राहिलेली दिसत आहेत; मात्र त्यानंतर नवनगर प्राधिकरण यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य ओसाड रस्त्यांच्या दुतर्फा पाच वर्षांपूर्वी विविध जातीच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने लाखो रुपये निधी खर्चही केला; मात्र नव्याने लावलेल्या झाडांची देखभाल आणि संगोपन न झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे कोमेजली. यातील काही झाडे सद्यस्थितीत जंगली झाडाझुडपात आणि रानवेलीच्या विळख्यात दडून गेली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवडीवर खर्च केलेला निधी वाया गेला आहे. जिल्हा प्रशासनाने वृक्षलागवड केली असली तरी देखभाल व संगोपनासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करूनही सध्यस्थितीत सिंधुदुर्गनगरीतील अनेक रस्ते आजही ओसाड दिसत आहेत.

शासनाने ओरोस, रानबांबुळी, अणाव या तीन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून जिल्हा मुख्यालयाची निर्मिती केली. शासकीय संकुल उभारले आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती. अजूनही अनेक रस्ते ओसाड असून त्या ठिकाणी फळाफुलांची झाडे लावण्याची गरज आहे.

आनंद पालव, स्थानिक स्टॉलधारक, ओरोस

जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये दहा वर्षांत जिल्हा प्रशासनाने अनेकदा वृक्षलागवड करून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे; मात्र त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष केल्याने ही झाडे तग धरू शकली नाहीत. वृक्ष लागवड करताना संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

योगेश तावडे, स्थानिक रहिवाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT