Hapus And Cashw Seed Purchased By Big Basket Ratnagiri Marathi News  
कोकण

बिग बास्केटकडून हापूससह "काजू बी' खरेदी 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - कोकणातून तीन कोटींचा हापूस खरेदी करून त्याची संपूर्ण देशभरात विक्री करणाऱ्या बिग बास्केट ऑनलाईन कंपनीने कोकणातील काजू बी खरेदीसाठी पावले उचलली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर लांजा, राजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी संवादही साधला आहे. गुणवत्तेनुसार काजू बी खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्याची देशभरातील विक्री होणार आहे. त्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून बाजारापेक्षा अधिक दर देऊन काजू बीची खरेदी करण्यात येणार आहे. 

कोकणातून लाखो टन काजू बी प्रक्रियेसाठी परराज्यात जातो. आठवडा बाजार, प्रक्रिया कंपन्या किंवा स्थानिक दुकानदार हीच खरेदीची केंद्र आहेत. कोकणातील काजूगराला देशातच नव्हे तर परदेशात मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन बिग बास्केट कंपनी काजू उद्योगात आली आहे. गेली तीन वर्षे कोकणातील बागायतदारांकडून आंबा खरेदी करून तो ऑनलाईनने दिल्ली, बंगळूरपासून देशभरात विकला जात आहे.

फळभाज्या आणि किराणा माल ऑनलाईन विक्रीत ओळख असलेल्या बिग बास्केट कंपनीने आता काजू बीच्या खरेदीसाठी यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुणवत्ता तपासून म्हणजेच बीमधील आर्द्रता तपासून शेतकऱ्यांना दीड ते दोन टक्‍के जादा दर दिला जाणार आहे. तसेच सरसकट बी घेतानाही बाजारातील दरापेक्षा पाच ते सात रुपये अधिक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. 

दरम्यान, काजू बी खरेदीसाठी बीग बास्केट कंपनी आणि पणन महामंडळाने लांजा येथील गवाणे आणि राजापूर येथे कार्यशाळा घेतली. त्यावेळी सुमारे पाचशेहून अधिक काजू बागायतदार उपस्थित होते. गुणवत्तापूर्ण काजू बी कशी असावी याचे मार्गदर्शन कोकण कृषी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पणनचे मिलिंद जोशी, शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कंपनीतर्फे केतन चौधरी, जयदीप सूर्यवंशी उपस्थित होते. 

बागायतदारांसाठी हे करणार 

  • बी ची प्रथमच ग्रेडींग करून खरेदी 
  • ऑनलाईन पेमेंट 
  • खरेदीची रिसीट 
  • बाजारापेक्षा अधिक दर 
  • वजन-काटे पारदर्शक 

आतापर्यंत सरसकट काजू बीची खरेदी करून स्थानिक व्यावसायिक विक्री करत होते; मात्र ऑनलाईन मार्केटमधील बीग बॉस या कंपनीने गुणवत्तेनुसार जादा दर देऊन काजू बी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- मिलिंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक, पणन 

काजू बी खरेदसाठी प्रथमच कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विक्री केंद्र उभारली जातील. थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार बी खरेदी करून गुणवत्तापूर्ण काजूगर बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. कोकणच्या हापूसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- जयदीप सूर्यवंशी, बिग बास्केटचे अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT