कोकण

#KonkanRains सिंधुदुर्गात पावसामुळे हाहाकार 

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी - जिल्ह्याला मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा आज तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरे, गोठे कोसळल्याचे प्रकार घडले; तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. समुद्राला उधाण असून किनारपट्टीला अजस्त्र लाटा धडकत आहेत.

देवबाग परिसरात समुद्राचे पाणी घुसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक दुपारनंतर पुन्हा बंद करण्यात आली. वादळी वाऱ्यामुळे वीज वितरणची सेवा कोलमडली असून, जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पुराचे पाणी भातशेती आणि बागायतीमध्ये घुसून नुकसानीचे प्रकार झाले आहेत. 

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागले आहेत. वादळामुळे पडझडीचे प्रकार वाढीस लागले आहे. जिल्ह्यातील मुळदे, सडुरे, साळशी या भागातील काही घरे व गोठ्यांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. वादळामुळे वेंगुर्ले तालुक्‍यातील आडेली-वेंगुर्ले रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. स्थानिक ग्रामस्थांनी झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. साळसी येथील पावणाई मंदिर व लगतच्या घरांना देखील वादळाचा तडाखा बसला आहे. 

वैभववाडी तालुक्‍यातील वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील सोनाळी येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली. तर कुसूरमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. कुसूरमध्ये भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मालवण, देवगड आणि वेंगुर्ले किनारपट्टीचा उधाणाचा धोका कायम आहे. किनारपट्टीला अजस्त्र लाटा धडकत असून देवबाग येथील समुद्राचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. सतत समुद्राचे पाणी वस्तीत येत असल्यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घारपी गावाला देखील वादळाचा तडाखा बसला. येथील घरे व गोठे कोसळले आहेत. 

गगनबावडा तालुक्‍यातील मांडकुली, किरवे, लोंघे या तीन ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पुन्हा आज दुपारी एक वाजल्यापासून ठप्प झाली. वाहतूक बंद झाल्याचा संदेश मिळेपर्यंत कित्येक वाहनांनी घाटरस्ता पार केला होता. त्या वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागले. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. 

वीज वितरणची सेवा कोलमडली 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे जिल्ह्यातील वीज वितरणची सेवा कोलमडून पडली. काल (ता. 3) रात्री जिल्ह्याचा बहुतांशी ग्रामीण भाग अंधारातच होता. आज सकाळी वीज पुरवठा सुरू झाला; परंतु सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. वादळामुळे अनेक भागातील वीज खांब व वीजवाहिन्या तुटल्या आहेत. 

पावसाचा परिणाम 
*कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द 
*जिल्ह्यातील मुख्य रस्ते जलमय 
*मळगाव रेल्वे स्टेशन मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुक ठप्प 
*बांद्यात चार दुकानांवर मोठे झाड कोसळले 
*किनारपट्टीवरील गावांना उधाणाचा धोका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT