Higher and Technical Education Minister Uday Samant press conference ratnagiri
Higher and Technical Education Minister Uday Samant press conference ratnagiri 
कोकण

ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचेच संरपंच: उदय सामंत 

राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघामध्ये 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. 600 सदस्यांपैकी 223 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ते सर्व शिवसेनेच्या विचाराचे आहेत. एवढ्या जागांवर विरोधकांना उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे 90 टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे संरपंच बसतील, असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला.


येथील हॉटेल व्यंकटेशमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले, खाडीपट्ट्यामध्ये डावखोल सर्व 7 बिनविरोध, कोंडये 7 पैकी 5 बिनविरोध, मांजरे 7 पैकी 4, मेढेतर्फे फुणगुस सर्व 7 जागा बिनविरोध, पिरंदवणे 7 पैकी सात, कुरधुंडा 7 पैकी 2, परचुरी सर्व 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले. एकूण 53 पैकी 43 बिनविरोध निवडून आले.


रत्नागिरी मतदारसंघातील हातखंबा जिल्हा परिषद गटात कशेळी 7 जागांपैकी 2, कापडगाव सर्व 9, हातखंबा 11 पैकी 8, खानू 9 पैकी 7, पाली 11 पैकी 10 असे शिवसेनेचे 34 उमेदवार बिनविरोध आले आहेत. मिरजोळे गटात मिरजोळे 17 पैकी 6, खेडशी 15 पैकी 9, मजगाव 7 पैकी 2, असे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले. पावस गटात नाखरे 9 पैकी 2, पावस 13 पैकी 2, गावखडी 11 पैकी 2, असे सहा उमेदवार बिनविरोध आले. वाटद गटात कळझोंडी 9 पैकी 3, रिळ सर्व 7, आगरनरळ सर्व 7, गुंबद 7 पैकी 4, सैतवडे 7 पैकी 1, वरवडे 11 पैकी 1 असे शिवसेनेचे 23 उमेदवार बिनविरोध आले.

नाचणे गटात पानवल सर्व 7, नाचणे 17 पैकी 4, असे अकरा उमेदवार बिनविरोध आले. गोळप गटात भाट्ये 9 पैकी 3, हरचेरी गटात कर्ला सर्व 11, हरचेरी सर्व 9, झरेवाडी 9 पैकी 5, कुरतडे सर्व 9 आणि चिंद्रवली सर्व 9 असे 46 उमेदवार बिनविरोध निवडून आले.कोतवडे गटात जांभरूण सर्व 7, खरवते सर्व 7, गणपतीपुळे 7 पैकी 1 असे 15 उमेदवार निवडून आले. करबुडे गटात उक्षी सर्व 7, राई 7 पैकी 1, चवे सर्व 7, खालगाव सर्व 9, असे 24 उमेदवार निवडून आले. मतदारसंघात एकूण 600 उमेदवार असून त्यापैकी शिवसेना विचाराचे 223 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT