Historical Sting Or Harp Found In Devrukha Kokan Marathi News 
कोकण

साखरपा-कोंडगावात सापडली ही ऐतिहासिक ही 'शिळा'...

सकाळ वृत्तसेवा

देवरूख (रत्नागिरी) :  कोल्हापुराहून येताना आंबा घाट उतरून आल्यानंतर संगमेश्वर तालुक्‍यातील साखरपा-कोंडगाव बस स्थानकाच्या अलीकडे डाव्या बाजूला सुमारे ‘चार फूट उंच व पावणेदोन फूट रुंद’ शिळा दिसून येते. यापैकी साधारण एक फूटभर शिळा जमिनीत असून या शिळेचा माथा त्रिकोणी आहे. या परिसरात या शिळेला ’गडदू’ असे म्हटले जाते. तथापि, याबाबत नक्की कुणालाही फारशी माहिती नाही. काही तज्ज्ञ मंडळींच्या मते ही शिळा म्हणजे ‘वीरगळ’ असल्याचे सांगितले जाते. 

साखरपा व कोंडगाव या दोन गावांच्या सीमेवर ही शिळा आहे. या गदडूच्या पूर्वेकडे साखरपा व पश्‍चिमेकडे कोंडगाव हे गाव आहे. या गडदुवर पूर्वेकडील बाजूला काही आकृत्या व अक्षरे कोरलेल्या कळतात. या शिळेवर वरच्या बाजूला अनुक्रमे चंद्र व सूर्य कोरलेले असून त्याखालील बाजूला एक पुरुष व एक गाढव यांचे ‘संकर करतानाचे’ चित्र कोरलेले आहे. या आकृतीच्या वर आणि चंद्र व सूर्य यांच्यामधील भागात काही पुसटशी अक्षरे दिसून येतात. 

शिळेला म्हणतात’गाढवाची तलख’
इतिहासाचार्य (कै.) वि. का. राजवाडे यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी या शिळेवरील लेखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे’ या मंडळातर्फे प्रकाशित झालेल्या ‘समग्र राजवाडे साहित्य खंड- ४’ या पुस्तकात याबाबतचा उल्लेख आढळतो.राजवाडे यांनी त्या पुस्तकात ’त्या गावाच्या इभ्रामपूर पेठेत ही शिळा आहे’ असं म्हटलंय. या शिळेला तयस्थ लोक ’गाढवाची तलख’ असं म्हणतात. शिळा प्रचंड खडबडीत असल्याने त्यावरील अक्षरे वाचण्यास खूप कठीण गेली, असे त्यांनी म्हटले आहे.

शिळेवर आहे चार ओळींचा उतारा

त्यांनी मोठ्या मेहनतीने-अंदाजाने लेखणी फिरवून या शिळेवर कोरलेल्या एकूण चार ओळींचा उतारा असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या शिळा महाराष्ट्रात काही ठिकाणी सापडतात. मुख्यतः शिलाहार राजवटीत अशाप्रकारच्या शिळा कोरल्या गेल्या. तरीदेखील यादव राजवटीत व मुसलमानी राजवटीतही अशा शिळा कोरल्या गेल्याचे नाकारता येत नाही. कसबा संगमेश्वर गावातील श्री कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातही अशा गद्धेगळ आढळून येतात. 

 लेखाचा बोध होत नाही
व्यक्तीला, किल्याला अथवा देवस्थानाला इनाम
कोंडगाव-साखरप्यातील या गडदूवरील लेखाचा बोध होत नसल्याने कोणत्या कारणासाठी ही शिळा उभारली हे नक्की सांगता येत नाही. मात्र, शिळेमुळे हे गाव अथवा येथील एखादी मोठ्या प्रमाणावर जमीन पुरातन काळी कुणा व्यक्तीला, किल्याला अथवा देवस्थानाला इनाम वैगरे दिली असल्याचे नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT