कोकण

आणीबाणीत लढा देणाऱ्या अकरा जणांचा सन्मान 

सकाळवृत्तसेवा

राजापूर - आणीबाणीच्या काळामध्ये लढा देणाऱ्या लोकांच्या योगदानाचा शासनाकडून तब्बल 42 वर्षांनी सन्मान झाला. आणीबाणीच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांसह त्यांच्या वारसांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. त्याचा लाभ तालुक्‍यातील अकरा जणांना मिळाला. या लोकांना देण्यात येणाऱ्या 2018 वर्षाच्या मानधनाच्या रकमेच्या फरकाची 11 लाख 40 रुपये एवढी रक्कम तालुक्‍याला प्राप्त झाली. त्याचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. 

1975 मध्ये देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली होती. लोकशाही वाचविण्यासाठी आणीबाणीच्या विरोधात अनेकांनी बंड पुकारले होते. आणीबाणी विरोधातील लढ्यामध्ये अनेकजण सहभागी झाले होते. त्यांच्यापैकी अनेकांची धरपकड होऊन अटकही झाली होती. त्यामध्ये काहींना तुरुंगवासही झाला होता. यापैकी काहींना रत्नागिरीसह पुण्याच्या येरवड्याच्या तुरुंगामध्ये राहावे लागले होते. या लोकांना शासनाकडून मानधन सुरू केले असून प्रत्यक्षात सहभागी असलेल्या लोकांना दहा हजार रुपये, तर वारसांना पाच हजार रुपये असे त्याचे स्वरूप आहे. या मानधनाचा तालुक्‍यातील अकरा लोकांना लाभ मिळाला असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. 

यांना मिळणार लाभ 
लोकशाही वाचविण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांसाठी शासनाने सुरू केलेल्या मानधनाचा तालुक्‍यातील अकरा जणांना लाभ मिळाला आहे. त्यामध्ये प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, सूर्यकांत कातकर, गोपाळकृष्ण रायकर, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, भालचंद्र नवरे, विजय भावे, विष्णू रानडे यांच्या पत्नी शैलजा रानडे, प्रभाकर इंदुलकर यांच्या पत्नी प्रमिला इंदुलकर, मधुसूदन बोरवणकर यांच्या पत्नी निर्मला बोरवणकर यांचा सामावेश आहे. 

""आणीबाणीच्या काळामध्ये लोकशाही वाचविण्यासाठी अनेकांनी लढा दिला होता. त्यामध्ये आपणही सहभागी झालो होतो. त्या काळामध्ये रत्नागिरी येथे तब्बल 35 दिवस तुरुंगवास भोगला. त्या काळातील अनेक कटू आठवणी मनामध्ये आहेत. शासनाने याची दखल घेतली, ही निश्‍चितच समाधानकारक बाब आहे.'' 

- प्रकाश आमकर, माजी नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT