आत्महत्या रोखण्यासाठी विद्यार्थीनी रिया लाडने बनवला हूक  sakal
कोकण

आत्महत्या रोखण्यासाठी विद्यार्थीनी रिया लाडने बनवला हूक

कोंड्ये येथील रिया लाड ; इन्स्पायर अ‍ॅवार्ड प्रदर्शनासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : जीवनयात्रा संपविण्यासाठी पंख्याला लटकून आत्महत्या करण्याच्या घटना रोखणारे ‘एस.पी.हूक’ (सुसाईड प्रिव्हेटींग हूक) नामक उपकरण विद्यार्थीनी रिया लाड हिने तयार केले आहे. या उपकरणाच्या सहाय्याने बंदखोलीमध्ये पंख्याला लटकून होणाऱ्या आत्महत्या रोखण्याला मदत होणार आहे. तालुक्यातील कोंड्ये येथील अमल विद्यावर्धिनी मुंबई संचलित निर्मला भिडे विद्यालय व इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. विविध कारणांमुळे मानसिक खच्चीकरण होवून वा मानसिक संतुलन बिघडून आलेल्या नैराश्येतून अनेकजणांनी घरातील पंख्याला स्वतःला लटकवून जीवनयात्रा संपविली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रियाने त्यावर उपाय शोधला.

रिया हिने तयार केलेल्या या अनोख्या आणि उपयुक्त उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अ‍ॅवार्ड प्रदर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्हास्तरीय इन्स्पायर मानक अवॉर्ड प्रदर्शनाकरीता ७७ विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांमधून रियाने तयार केलेल्या या उपक्रमाची निवड झाली. राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेले राजापूर तालुक्यातील हे एकमेव उपकरण ठरले आहे.

विविध कारणांमधून मानसिक खच्चीकरण होवून अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडत असतात. वारंवार घडणार्‍या या घटनांबाबत समाजाच्या विविध घटकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांमध्ये अनेकजण घरातील बंद खोलीतील पंख्याला स्वतःला लटकवून आत्महत्या करीत असल्याचे चित्र दिसते. त्या कशा रोखता येतील यावर विचार विनियम करून कोंड्ये हायस्कूलची विद्यार्थीनी रिया हिने एस.पी. हूक हे आत्महत्या रोखणारे उपकरण तयार केले आहे. त्यासाठी तिला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक प्रशाळेचे मुख्याध्यापक अरूण कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हास्तरीय इन्स्पायर मानक अ‍ॅवार्ड प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्या प्रदर्शनामध्ये रिया हिने तयार केलेल्या ‘एस.पी. हूक’ या उपकरणाने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नव्हे तर, हे उपकरण परिक्षकांच्या पसंतीला उतरताना त्या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अ‍ॅवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

एस.पी. हूक असे करणार काम

इमारतीचे बांधकाम करताना एखाद्या खोलीमध्ये पंखा अडकविण्यासाठी छताला सुरूवातील हूक तयार करून ठेवला जातो. या हूकाला एस.पी.हूक अडकवून त्या हूकाला पंखा अडकवायचा. छताच्या मूळ हुकाला एस.पी. हूक अडकविलेला फारसा निदर्शनास येत नाही. पंख्याला सुमारे दहा किलोपेक्षा जास्त वजन लटकत त्यावेळी खर्‍या अर्थाने एस.पी. हूकाचे काम सुरू होते. त्यामध्ये दहा किलोपेक्षा जास्त वजन लटकते. त्यावेळी एस.पी.हूक अ‍ॅटोमेटीक पंखा सोडून देते. त्यानंतर पंखा एकदम जमीनीवर खाली न येतो तो सावकाशपणे खाली येतो. त्याच्यातून आत्महत्या रोखली जाते. विज्ञान शिक्षक ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी ही माहिती दिली. पंखा खाली येत असताना त्याला जोडणी करण्यात येणारी वीजेची तार तुटून त्यातून व्यक्तीला शॉक लागण्याची शक्यता असते. ही शक्यता ओळखून तशी घटना घडणार नाही अशी यंत्रणा या एस पी हूकमध्ये तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT