illegal alcohol confiscated from sindhudurg police in banda sindhudurg rupees 3 lakh and above 
कोकण

सिंधुदुर्गात दोन कारवायांमध्ये १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : येथील पोलिसांनी दोन बेकायदा दारू वाहतुकीत १२ लाख २७ हजार ९२४ हजार रुपयांचा मुद्देमाल काल (ता. १) रात्री जप्त केला. दोन कारवायांत तीन लाख ७७ हजार ९२४ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

पहिल्या कारवाईत गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाराa आयशर टेम्पो (एमएच ४३ बीजी ३९१०) तपासणीसाठी बांदा सटमटवाडी येथे थांबविण्यात आला. यावेळी टेम्पोत ६८ हजार ३२४ रुपयांची गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेली आढळून आली. 
दारूसह ७ लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण सात लाख ६८ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विजयकुमार नागेंद्र राय (वय ४४, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल वटकर, बांदा पोलीस बंड्या पाटील, राजाराम कापसे, जिल्हा मुख्यालयातील अंमलदार पावसकर, खांडेकर यांनी केली.

दुसऱ्या कारवाईत तीन लाख नऊ हजार ६०० रुपयांच्या दारुसह दीड लाख रुपयांचा टेम्पो (एमएच ०७ पी २६४७) असा एकूण चार लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी संतोष नारायण कुडतरकर (वय ३५, रा. माणगाव मळावाडी) व दिलीप राजन धुरी (वय २७, रा. माणगाव बेतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल विठोबा सावंत यांनी केली. अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT