कोकण

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; तेरेखोल नदी पातळीत वाढ

निलेश मोरजकर

शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे.

बांदा (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले आहे. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. (in banda al wadi market, flood water of terekhol river has infiltrated into the building)

बांदा शहर व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सततधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज पहाटेच्या सुमारास तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी वाढत असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

आळवाडी येथील मच्छीमार्केट इमारतीत पुराचे पाणी घुसले आहे. येथील आळवे यांच्या हॉटेलपर्यंत पुराचे पाणी आहे. मात्र आळवाडी-निमजगा रस्ता पहाटेच पाण्याखाली गेला आहे. येथील छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटर मध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा देखील सखल भागात पाणी आल्याने अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर अद्याप असल्याने व पाणी पातळी वाढत असल्याने पूर प्रवण क्षेत्रातील नागरिक चिंतेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT