india economic development atmanirbhar bharat public utility schemes narayan rane Sakal
कोकण

देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश आत्मनिर्भर करण्यासाठी लोकोपयोगी योजना - नारायण राणे

गेल्या नऊ वर्षांत या समाजासाठी ५४ योजना राबविण्यात आल्‍याचे मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Mahad News : देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार विविध लोकोपयोगी योजना राबवीत असून त्याचा लाभ समाजातील विविध घटकांना होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला.

तसेच पीएम जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातही अलिबाग येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. या वेळी नारायण राणे यांनी सांगितले की,

केंद्र सरकारकडून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत या समाजासाठी ५४ योजना राबविण्यात आल्‍याचे मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

विविध योजनांचा लाभ

यावेळी रायगड जिल्ह्यात पीएम जनमन अभियानांतर्गत एक हजार ८९६ पक्क्या घरांना मान्यता, एक हजार ७५५ घरांना नळपाणी पुरवठा योजनेस मान्यता, एक हजार ९७४ घरांपर्यंत वीजपुरवठा,

१५ वाड्यांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांना मंजुरी, कातकरी विद्यार्थ्यांकरिता तीन वसतिगृह, कातकरी वाड्यांमध्ये २० अंगणवाडी केंद्रांना मंजुरी, सुधागड तालुक्यातील कातकरी वाड्यांसाठी १५ मोबाईल मेडिकल युनिटला केंद्राने मंजुरी दिली आहे.

सर्व शासकीय दाखल्‍यांचे वाटप

रायगड जिल्ह्यात एकूण ५९६ ठिकाणी एक हजार १४ कातकरी वाड्या असून एक लाख ८१ हजार ९७३ इतकी लोकसंख्या आहे. पेण कार्यालयांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्‍या माध्यमातून एक हजार १४ वाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले.

यातील लाभार्थ्यांना पक्की घरे, विद्युतीकरण, सामुदायिक तसेच नळाद्वारे पाणीपुरवठा, व्यावसायिक प्रशिक्षणासह दाखल्यांचे वाटप सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ३६० शासकीय मेळावे घेऊन करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT