Israel-Hamas War Samata Gokhale-Dandekar
Israel-Hamas War Samata Gokhale-Dandekar esakal
कोकण

इस्राईलमध्ये युद्धाच्या छायेत राजापूरची कन्या सुखरूप; रॉकेटस्‌च्या माऱ्याचा दांडेकरांनी सांगितला प्रत्यक्ष अनुभव

राजेंद्र बाईत

दिलीप गोखले यांच्या कन्या समता या पती योगेश दांडेकर यांच्यासोबत इस्राइल येथे गेल्या आहेत.

राजापूर : इस्राइलमध्ये युद्धजन्य (Israel-Hamas War News) स्थितीतही जनजीवन सुरक्षित अन्‌ सुरळीत आहे. रॉकेटचा मारा या भागामध्ये कधी ना कधी होत असतो. त्याला प्रतिकार करणारी सक्षम यंत्रणा शासनाने उभारलेली असल्याने सर्वसामान्याप्रमाणे रॉकेटच्या माऱ्‍याचा आणि त्यानंतर सायरन वाजल्यानंतर सुरक्षिततेसाठी शेल्टरमध्ये जाण्याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला, असा प्रत्यक्ष अनुभव राजापूरच्या सुकन्या समता गोखले-दांडेकर (Samata Gokhale) यांनी सांगितला.

शहरातील दिलीप गोखले यांच्या कन्या समता या पती योगेश दांडेकर यांच्यासोबत इस्राइल येथे गेल्या असून, गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलचा मध्यवर्ती भाग असलेल्या बार ईलान विद्यापीठ परिसरामध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’द्वारे फोनद्वारे संपर्क साधला असता युद्धाच्या छायेतील जगण्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘सीमावर्ती भागापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर वास्तव्याला असलो, तरी आम्ही सुरक्षित असून, या भागातील जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे.

हल्ला झाला त्या दिवशी (ता. ७) ऑक्टोबरला सुटी होती. त्यामुळे इथल्या पद्धतीनुसार बाहेर शाळा, ऑफिस, दुकाने, बस, ट्रेन बंद असल्याने आधीच शांत वातावरण होते. ८ ऑक्टोबरपासून सीमावर्ती भाग सोडून बाकी पूर्ण देशभर दुकाने, बस, ट्रेन, आवश्यक ऑफिस वगैरे सुरू झाली आहेत. आम्ही सुरक्षित असलो तरी पीडित लोकांच्या वेदना पाहून पूर्ण दिवसभर मनात संवेदनशील झालं होतं. केवळ इस्रायलमधीलच नव्हे, तर भारताच्या आणि इतर देशांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्‍या लोकांचं जीवन, त्यांच्या अडचणी, असे विचार पूर्ण दिवसभर डोक्यात घोंगावत होते,’ असे त्यांनी सांगितले.

आयर्न डोम यंत्रप्रणाली

शत्रूची घातक रॉकेटस् वा क्षेपणास्त्र जमिनीवर पडण्यापूर्वी वा लक्ष्याचा भेद करण्यापूर्वी ती हवेतच निकामी करणारी वैशिष्ट्यपूर्ण आयर्न डोम यंत्रप्रणाली इस्रायलने विकसित केली आहे. शत्रूकडून येणारी रॉकेट्सची दिशा बघून त्याचा अचूक वेध घेणारी प्रतिक्षेपणास्त्रही या यंत्रणेच्या माध्यमातून सोडली जातात. आयर्न डोम यंत्रणेच्या साहाय्याने इस्रायलने शत्रूने मारा केलेली अनेक क्षेत्रणास्त्र आणि रॉकेटस् नष्ट केल्याची माहिती समता गोखले यांनी दिली.

सुरक्षिततेच्यादृष्टीने शेल्टरही महत्त्वपूर्ण

लोकवस्ती वा इमारतींचे नुकसान करण्यासाठी शत्रूकडून डागण्यात येणा‍र्ऱ्या क्षेपणास्त्र वा रॉकेटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इमारतींमध्ये शेल्टर उभारण्यात आली आहेत. हे शेल्टर म्हणजे रॉकेटपासून बचाव करणारी जागा. आयर्न डोमच्या कार्यप्रणालीमध्ये चुकून काही बिघाड झाल्यास लोकांना रॉकेटपासून इजा होणार नाही, या दृष्टीने सुरक्षित आणि भक्कम व्यवस्था उभारण्यात आलेली आहे.

जुन्या इमारतींमध्ये शेल्टर हे तळघरात असतात, तर १९९० नंतर बांधलेल्या सर्व इमारतींत शेल्टर प्रत्येक मजल्यावर असतात. ज्या भागामध्ये क्षेपणास्त्र वा रॉकेटस् येणार आहे, त्या भागातील लोकांना संदेश देण्यासाठी सायरन वाजवले जाते. सायरनचा आवाज येताच लोक शेल्टरमध्ये जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT