कोकण

#FormalinCase गोव्याच्‍या गाड्यांना अटकाव करू

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - मासे वाहतूक करणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना गोवा राज्याने बंदी घातली आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. बंदीचा निर्णय गोवा राज्याने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिवाहतूक करणाऱ्या गाड्यांनाही अटकाव करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा देवगड आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील मच्छीवाहतूकधारकांनी आज जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

गोवा राज्याने केमीकलयुक्‍त मासे (फॉर्मेलिन) वाहतूक होत असल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घातली आहे. सिंधुदुर्ग येथून गोवा येथे जाण्यासाठी केवळ दोन तासाचे अंतर असताना ताज्या मासळीला इन्सुलेटेड गाडीची आवश्‍यकता वाटत नाही. हा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांवर अन्यायकारक आहे, असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालक-ंचे म्हणणे आहे. आज याबाबत देवगड व वेंगुर्ले तालुक्‍यातील मच्छी वाहतूक करणाऱ्या मच्छीवाहतूक धारकांनी जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देवून त्यांचे लक्ष वेधले.

दरम्यान, याबाबत देवगड व वेंगुर्ले तालुक्‍यातील मासे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक-मालक वाहनधारकांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी गोवा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात गोव्यातील सिंधुदुर्गात मच्छीवाहतूकीसाठी येणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याचा इशारा दिला आहे.  याबाबतचे निवेदन सादर करताना वेंगुर्ले तालुक्‍यातील संदीप पेडणेकर, अंकुश वेंगुर्लेकर, गोल्डन फर्नाडीस, नयन पेडणेकर यांच्यासह देवगड तालुक्‍यातील किरण कांबळी, नितीन देशपांडे, सौरभ गोगटे, संतोष प्रभू, सतिश परब, राजेंद्र मेस्त्री, संतोष कोयंडे, प्रकाश धुरी, मंगेश मेस्त्री आदी मच्छी वाहतूकदार चालक-मालक उपस्थित होते.

कुटील डाव रचल्याचा आरोप
वाहतूकीदरम्यान गोवा राज्याने मासे वाहतूक करणाऱ्या वाहनातील माशांची तपासणी केली असता एकही वाहनातील मासे हे केमीकलयुक्‍त सापडलेले नाहीत, असे असताना देखील आता इन्सुलेटेड व्हॅन गाड्यामधूनच मासे वाहतूक करण्याचे कारण पुढे करून सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथील सर्व गाड्यांवर गोवा राज्यात वाहतूक करण्यास बंदी घालून जिल्ह्यातील वाहन धारकांना बेरोजगार व कर्जबाजारी करण्याचा कुटील डाव रचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT