Issue Of Sindhudurg Tax Coupon Marathi News
Issue Of Sindhudurg Tax Coupon Marathi News 
कोकण

"सिंधुदुर्ग कर पावती' यामुळे संशयाच्या भोवऱ्यात 

सकाळ वृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्यास आलेल्या पर्यटकांना स्वतंत्र अभ्यांगत कराची पावती देणे आवश्‍यक असताना काही दिवसांपूर्वी आलेल्या 35 पर्यटकांच्या समूहाला एकत्रित हाती लिहीलेली कराची पावती देण्याचा प्रकार घडला आहे. ही कर आकारणी संशयास्पद असल्याचा अंदाज पर्यटकांनी व्यक्त करत या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. 

किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्यास 8 मार्चला पर्यटकांच्या 35 जणांचा समूह गेला होता. किल्ला पाहण्यास येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी पाच रूपये अभ्यांगत कर स्विकारून त्याची रितसर पावती दिली जाते; मात्र या पर्यटकांना एकच पावती देत 175 रुपयांची आकारणी करण्यात आली. पाच रुपयांच्या अभ्यांगत कराची पावती ही प्रिंटेड स्वरूपाची असताना पर्यटकांना हाती लिहून कराची आकारणीची पावती देण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामगारांकडून होणारी कर आकारणी ही संशयास्पद असल्याचे पर्यटकांनी स्पष्ट करत या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान यासंदर्भात दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी, वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीच्या कामगारांनी संबंधित पर्यटकांना एकत्रित पावती दिली असल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची तक्रार ग्रामपंचायतीकडे आल्यानंतर सरपंच व आपण संबंधित कामगारांना बोलावून घेत या प्रकाराची माहिती घेतली. एकत्रित पावती पर्यटकांना देणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत यापुढे असा प्रकार घडता नये, अशा सूचना देत योग्य ती समज देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT