कोकण

Janjira Fort: जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी खुला; स्थानिक उद्योग-व्यवसायाला येणार गती

कचरा उचलून परिसर स्‍वच्छ करण्यात आल्‍यावर जंजिरा किल्‍ला रविवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Kokan News: पावसाळ्यात खवळलेला समुद्र, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या उंच लाटांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. वाढलेले गवत, झाडे, वेली, कचरा उचलून परिसर स्‍वच्छ करण्यात आल्‍यावर जंजिरा किल्‍ला रविवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

त्‍यामुळे राजपुरी जलवाहतूक संस्था, पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून पर्यटन व्यवसायावर आधारित उद्योग-व्यवसायाला गती येण्याची शक्‍यता आहे.

साधारण १ सप्टेंबर रोजी जंजिरा किल्ला सुरू होणे अपेक्षित होते; मात्र सुरक्षेच्या कारणामुळे पुरातत्त्व विभागाने एक महिन्यापेक्षा अधिक काळ पर्यटकांना रोखून धरले होते; मात्र आता संपूर्ण किल्ल्याची साफसफाई झाली असून रविवारी पुरातत्त्व विभागाने जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडले. पर्यटकांची वर्दळ वाढेल, या अपेक्षेने स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असून राजपुरी जेटी, खोरा बंदर, दिघी बंदरातून प्रवासी वाहतूक केली जाते. पर्यटकांना शिडाच्या बोटींतून प्रवासाने विशेष आनंद मिळत असल्‍याने याच बोटींना पसंती दिली जाते.

राजपुरी बंदरातून किल्‍ल्‍यावर प्रवासी वाहतुकीसाठी बारा वर्षांपर्यंत ५० रुपये तर १२ वर्षांवरील व्यक्‍तीस १०० रुपये आकारले जात असल्‍याची माहिती जंजिरा पर्यटक सहकारी संस्‍थेचे व्यवस्थापक नाझिम कादिरी यांनी दिली.

या व्यतिरिक्त पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यात प्रवेश करतेवेळी १५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना शुल्क माफ असून १६ वर्षांवरील प्रति व्यक्तीस २५ रुपये आकारण्यात येत असल्‍याची माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्त्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Latest Marathi News Live Update : गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टर, एजंट ताब्यात, कोल्हापुरात कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

Chhatrapati Sambhajinagar: दोन दिवसांत ४२०० पर्यटकांची उद्यानाला भेट; सलग सुट्यांचा परिणाम;नाथषष्ठीच्या उत्सवानंतर पैठणमधील बाजारपेठेत चैतन्य

SCROLL FOR NEXT