Kashedi Tunnel on Mumbai-Goa Highway esaka
कोकण

Kashedi Tunnel : गणेशोत्सवात भक्तांना मोठा दिलासा! धोकादायक घाटातील प्रवास होणार सुखकर, 'हा' बोगदा वाहनांसाठी खुला

हा मार्ग 11 सप्टेंबरपासून हलक्या वजनांच्या वाहनांसाठी खुला होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईकडून येणाऱ्या चाकरमान्यांना या बोगद्यात काही नियम पाळून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी बोगद्यातील (Kashedi Ghat Tunnel) मुंबईकडून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका ११ सप्टेंबरपासून हलक्या वजनांच्या वाहनांसाठी खुली होणार आहे.

गेले अनेक महिने रखडलेल्या कशेडी घाटाला पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या बोगद्याला अखेर तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीला खुला करण्यात येत असल्याने धोकादायक कशेडी घाटातील प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत कशेडी बोगद्यातील एक मार्गिका ११ सप्टेंबरपासून हलक्या वजनांच्या वाहनांसाठी खुली करण्याचे आदेश दिले. कातळी-भोगावच्या भुयारी मार्गातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. भुयारी मार्गापर्यंत जाणाऱ्या महामार्गावरील तीन पुलांचे काम अपूर्ण असताना त्या ठिकाणांना वळसा घालून पर्यायी एकमार्गी वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात येत आहेत.

या रस्त्यांना भेगा पडल्यानंतर काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. या बोगद्याला जोडणारा रस्ता जवळपास ९० टक्के काँक्रिटीकरण करून पूर्ण झाला आहे. उर्वरित रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईकडून येणाऱ्या चाकरमान्यांना या बोगद्यात काही नियम पाळून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

यामध्ये या संपूर्ण प्रवासात न थांबता आपले वाहन ताशी ३० किमी या वेगाने मुख्य रस्त्यावर आणावे लागेल. या बोगद्याची लांबी सुमारे १.७१ किमी असून या दरम्यान वाहन थांबवता येणार नाही. या बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बोगद्यात लाईटची व्यवस्था केली आहे. तसेच वेगमर्यादा व इतर सूचनांचे फलक जागोजागी लावण्यात येणार आहेत. याशिवाय वाहन नादुरुस्त झाल्यास मदतीसाठी आवश्यक ती मदत देण्यात येण्याची शक्यता आहे.

वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी

''एकमार्गी'' वाहतुकीसाठी तयार केलेल्या रस्त्यावरून हलक्या वजनाची छोटी वाहने काँक्रिटीकरणाचा रस्ता न केलेल्या डाव्या बाजूला घसरल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेऊन वाहन चालवणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT