ई-पीक  Sakal
कोकण

Kokan : ई-पीक नोंदणी अत्यावश्यक

व्ही. एस. कविटकर : मडुऱ्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

बांदा : शासन निर्देशानुसार शासकीय योजना तसेच नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-पीक अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सातबारावर पिकाची नोंदणी करावी, असे आवाहन मडुरा सजा तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी मडुरा येथे केले.

सुधारित मोबाईल अॅपमध्ये प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट असतात. शेतकरी ज्यावेळी पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीत दिसणार आहे. पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून शेतकरी दूर असल्यास तसा मेसेज मोबाईल अॅपमध्ये दाखविण्यात येणार आहे. मोबाईल अॅपद्वारे नोंदविलेली पीक नोंदणी चुकीची झाल्यास ४८ तासांच्या आत त्यामध्ये बदल करण्याची सुविधा दिली आहे.

किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पाहणीसाठी पिकांची ई-पीक नोंदणी केल्यास अॅपमध्येच शेतकऱ्यांना आपणास किमान आधारभूत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्यांनी ‘होय’, असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब प्रणालीद्वारे पुरवठा विभागाकडे प्राप्त होणार आहे. त्यामुळे किमान आधार योजनेंतर्गत अशा शेतकऱ्यांची आपोआपच नोंदणी होणार आहे.

या अॅपमध्ये एक मुख्य पीक व अन्य तीन दुय्यम पीके नोंदणी करण्याची मुभा आहे, अशी माहिती कविटकर यांनी दिली. यावेळी मडुरा सोसायटी माजी चेअरमन ज्ञानेश परब, बाळू गावडे, यशवंत माधव, माजी उपसरपंच उदय चिंदरकर, दत्ताराम परब, रामा परब, दिनेश परब, केशव परब, प्रीतेश गवंडी, संभाजी परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT