कोकण

#KonkanRain नदीचा प्रवाह बदलल्याने 200 एकरला फटका 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - गेले आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मोठ्या नद्यांसह उपनद्यांनाही पूर आला आहे. संगमेश्वर तालुक्‍यातील कोंड्ये-डावखोल गावातून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह बदलला असून, शेजारच्या भातशेतीला फटका बसला आहे. नदीचे पाणी पात्र सोडून बाहेर पडले असून, आजूबाजूची सुमारे शेकडो एकर जमीन धोक्‍यात आली आहे. 

जिल्ह्यातील पावसाचा जोर अजूनही कायम आहे. शुक्रवारी (ता. 26) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस 57.11 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यात मंडणगड 117, दापोली 62, खेड 87, गुहागर 47, चिपळूण 47, संगमेश्‍वर 39, रत्नागिरी 44, लांजा 48, राजापूर 23 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेले आठवडाभर सगळीकडेच पावसाचा जोर आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे गावातून वाहणाऱ्या नदीने प्रवाहच बदलला आहे. डावखोल, कोंड्ये येथील नदी थेट भात शेतामधूनही वाहत आहे. किनारी भागात जवळपास 200 एकर शेतजमीन आहे. पावसाचा जोर कमी होऊनही सध्या नदीचा प्रवाह बदललेलाच आहे.

या भागात लावण्यांची कामेही पूर्ण झालेली आहेत. पावसामुळे पिकेही तरारू लागली होती. प्रवाहाबरोबर आलेल्या दगड-मातीमुळे शेतीची वाताहत झाली आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे भात मुख्य पीक आहे. त्याचेच नुकसान झाल्यामुळे यंदा गैरसोय होणार आहे. प्रवाह बदलण्याला गाळ कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानीचे पंचनामे झाले असून, भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. 
- पूनम देसाई,
सरपंच, कोंड्ये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT