ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात अखेर कोविड प्रतिबंधक लस गुरूवारी सायंकाळी दाखल झाली आहे. लस घेऊन येणाऱ्या वाहनाचे जिल्हा आरोग्य विभागाने विधिवत स्वागत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 10 हजार 260 डोस आले आहेत.
लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी (ता. 16) होणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.
ही मोहीम जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थेत राबविली जाणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण केले जाणार आहे. तिन्ही संस्थांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. प्रारंभाच्या दिवशी या तिन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्य याबाबतची पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
तीन टप्प्यांत लसीकरण
पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णाशी थेट संपर्क येणाऱ्या डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णाशी लांबून संपर्क होणाऱ्या पोलिस, आशा स्वयंसेविका आदी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेत आढळून आलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांना ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
असे होईल लसीकरण
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.