Landslide at Phonda Parshuram Ghat esakal
कोकण

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फोंडा, परशुराम घाटात कोसळली दरड; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची काय आहे स्थिती?

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट संवेदनशील ठरलाय.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-गोवा महिनाभरापूर्वी मोठी दरड कोसळली होती. ती दरड बंद असलेल्या लेनवर तशीच आहे.

चिपळूण : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) दगडमाती व काही प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक थांबवण्यात आली. दरड खाली येत असल्याचे लक्षात येताच दोन्हीकडील वाहने थांबवण्यात आली.

यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर आलेली दगडमाती बाजूला केल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेची माहिती चिपळूण पोलिस आणि महसूल प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांनी परशुराम घाटात धाव घेतली. या वेळी वाहतूक सुरू असणाऱ्या लेनवर दरडमाती आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक रोखून दगडमाती तत्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट संवेदनशील ठरला असून, गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. या ठिकाणी २४ तास देखरेख करण्यात येणार असून, दुर्दैवाने दरड कोसळल्यास डंपर, जेसीबी, तैनात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

महिनाभरापूर्वी कोसळलेली दरड तशीच

मुंबई-गोवा महिनाभरापूर्वी मोठी दरड कोसळली होती. ती दरड बंद असलेल्या लेनवर तशीच आहे. त्यामुळे आता या दरडी नव्याने दगडमाती कोसळून ती वाहतूक सुरू असलेल्या लेनवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्ग ठेकेदार कंपनीने ही दरड तत्काळ हटवावी, अशी मागणी होत आहे, अन्यथा आगामी काळात दरड कोसळल्यास ती महामार्गावर येण्याचा धोका आहे.

फोंडा घाटात दरड कोसळली, तीन तास वाहतूक ठप्प

कणकवली : दोन दिवस सुरू असलेल्‍या संततधार पावसामुळे फोंडाघाट येथे दरड कोसळी. सार्वजनिक बांधकामच्या पथकाने दुपारी एकला दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता के.के.प्रभू, शाहू शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

जेबीसीच्या साहाय्याने घाटमार्गातील दगड बाजूला करण्यात आले. त्‍यानंतर दुपारी एकला घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला; मात्र सायंकाळी चार पर्यंत घाट मार्गात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही प्रमाणात दगड माती खाली येत होती. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT