कोकण

लांजा येथील विश्रामगृहाचे तब्बल दीड वर्षांनी उद्‌घाटन

सकाळवृत्तसेवा

लांजा - नूतनीकरण करून वापरात आलेल्या लांजा शासकीय विश्रामगृहाचे उद्‌घाटन तब्बल दीड वर्षांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. २५ जानेवारीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लांजा शासकीय विश्रामगृहाचे केलेले उद्‌घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

जुन्या इमारतीवरच दुरुस्ती आणि रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यासाठी तब्बल ६५ लाख रुपये खर्च केले. या खर्चात नवीन इमारत उभी राहिली असती इतका अफाट खर्च या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप तालुका आमसभेत केला होता. आमसभेत वादळी चर्चा होऊन चौकशीची मागणीही जनतेतून करण्यात आली होती. शुक्रवारी अचानक घाईगडबडीत उद्‌घाटन कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते उरकून घेण्यात आल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेचा झाला आहे.

नूतनीकरणानंतर या शासकीय विश्रामगृहाचा वापर सुरू होता. दीड वर्षानंतर बांधकाम विभागाला उद्‌घाटन करण्याची उपरती झाल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे. उद्‌घाटनाचे नाटक करायला लावण्यामागे बोलवता धनी वेगळाच असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी केली. बांधकाम विभागाने कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे सय्यद यांनी सांगितले. रेस्टहाऊसच्या नूतनीकरणाचे काम सदोष असून इमारतीची उंची कमी करून पत्र्याचे छप्पर अशोभनीय आहे. पत्र्याचे छप्पर टाकण्यामागचा नेमका हेतूच स्पष्ट होत नसल्याचे सय्यद यांनी सांगितले.

चौकशीची मागणी
सुमारे ६५ लाख खर्चून बांधलेल्या या शासकीय विश्रामगृहाच्या कामात गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त करताना पालकमंत्री वायकर यांनी या कामाची चौकशी लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रताप पवार आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत शिष्टमंडळ नेमून कार्यवाही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हा कार्यक्रम राजकीय श्रेयासाठीच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून आयोजित केला होता. बांधकाम विभाग सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत आला असल्याचे चित्र या उद्‌घाटन कार्यक्रमावरून स्पष्ट झाले. आमदारांचा हा राजकीय स्टंट असून केवळ श्रेय घेण्यासाठीच हा उद्‌घाटन कार्यक्रम हाती घेण्यात आला.
-सचिन माजळकर, 

जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमान पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT