Launch of Vaccination Center at Rajapur Rural Hospital ratnagiri 
कोकण

राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्राला शुभारंभ; यांना लसीकरणापासून येणार वगळण्यात 

राजेंद्र बाईत

राजापूर:  “ राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण सेंटर मंजूर झाल्याबद्दल तसेच कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री आणि सर्व सहकार्‍यांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे.” असे गौरवोद्गार माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी लसीकरण केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी काढले. यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 


देशभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडीयाने लस तयार केली आहे. त्याचे लसिकरण करण्याला शुभारंभ झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पाच लसीकरण केंद्र मंजूर झाले असून त्यामध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा समावेश आहे. कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरण कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राजापूर ग्रामीण रूग्णालयातील लसीकरण केंद्राचा शुभारंभ आज (ता.16) झाला. यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, नायब तहसिलदार अशोक शेळके, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नोडल ऑफिसर डॉ सतीश पाटील,  नरसेवक गोविंद चव्हाण आदी उपस्थित होते. 


यावेळी डॉ. मेस्त्री या लसीकरण मोहिमेसंबंधित सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांना ही लस देण्यात येणार असून अठरा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेह, रक्तदाब असलेल्या रूग्णांना या लसीकरणापासून वगळण्यात येणार असल्याचे डॉ. मेस्त्री यांनी सांगितले. ज्या व्यक्तीला लसीकरण करण्यात येणार आहे त्या व्यक्तीला लसीकरणानंतर काही काळ वैद्यकीय निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणासाठी रूग्णालयामध्ये करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोरोना संसर्गाला तालुक्यामध्ये रोखण्यामध्ये सार्‍यांचेच एकत्रित प्रयत्न उपयुक्त ठरले असून त्याबद्दल डॉ. मेस्त्री यांनी सार्‍यांना धन्यवादही दिले.  यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे, पोलिस निरिक्षक श्री. परबकर यांनी मनोगत व्यक्त करताना सार्‍यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT