ht.jpg 
कोकण

सिंधूदुर्ग : कुर्लीतील ज्येष्ठ दाम्पत्यांवर बिबट्याचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पवार दाम्पत्यांवर बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २०) रात्री बारा वाजता कुर्ली येथे घडला. यामध्ये मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

दरम्यान, कुर्ली येथे मोहन पवार हे कुटुंबीय काल रात्री जेवण आटोपून झोपण्यासाठी गेले. रात्री बाराच्या सुमारास त्यांचा पाळीव कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे पवार यांनी कुत्रा का भुंकतो म्हणून पाहीले असता घराच्या पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते. पवार कुत्र्याला सोडविण्यासाठी आरडाओरडा केला असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी पवार गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले.

दरम्यान, घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्यामुळे बिबट्याच्या या दहशतीमुळे कुर्ली गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण अधिक असून, बिबट्यांचे वस्तीत येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: ट्रम्पच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजार हाहाकार! सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला; नेमकं काय घडलं?

Pimpri Building Collapse: पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; १४ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Latest Marathi News Live Update : इमारतीचा भाग कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Pune: शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला; कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Pandharpur Wari 2026: लाखो लोक पायी पंढरपूरला का जातात? वारी म्हणजे काय अन् वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? इथे वाचा

SCROLL FOR NEXT